Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुर, कायर आणि वणी वासियांनी विकेंड लॉकडाऊनला दिला 100 टक्के प्रतिसाद

वणी (दि.10 एप्रिल ) :– राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संकटाला सामोरे जायचे असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागेल. यासाठी कडक निर्बंध आवश्यकच आहे. या  उद्देशाने विकेंड लॉकडाऊनला राजुर, कायर आणि वणी येथे 100 टक्के प्रतिसाद नागरीकांनी दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार शनिवारी 100 टक्के बंद ठेवण्यात आले.

चौका – चौकात पोलिस तैनात

100℅ बंदला अत्यावश्यक सेवा वगळता

.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत नगरमध्ये विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासूनच संचारबंदी लागू झाली असून प्रमुख चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे.

आज (शनिवारी) सकाळपासूनच रस्त्यावरील गर्दी पुर्णपणे थांबलेली दिसून येत होती. राजुर चौकात, कायर चौकात व वणी दिपक चौपाटी पासून तर साई मंदिर चौक आदी चौकात देखील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वंच ठिकाणी 100 टक्के विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद देण्यात आला आहे.शहरातील गजबजलेल्या बाजार चौक, कापडबाजार, लालगुड़ा रोड आदी परिसरात मेडिकल, दूध डेअरी वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. तर  शहरातील प्रमूख चौकांमध्ये पोलिस तैनात करण्यात आले असून येणार्‍या जाणार्‍यांची चौकशी करूनच त्यांना सोडण्यात येत आहे.विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर व मास्क नसलेल्यावर वणी तहसील सामोर कारवाई करण्यात येत आहे. संचारबंदी असली तरी लसीकरणासाठी तसेच वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडणारांना मुभा देण्यात आली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाही परवानगी देण्यात आलेली आहे.

 

आजच्या बंद मुळे शहरातील सर्वच रस्ते शांत होते तर फक्त मेडिकल ची दुकाने सुरु होती व एस.टी.बस स्थानक मध्ये एकही एसटी बस नव्हती. रिक्षा सुरू होत्या पण त्यामध्ये बसण्यासाठी प्रवासी नव्हते अशी परिस्थिती एकंदरीत वणी ,राजुर व कायर मध्ये दिसत होती.विकेंड लॉकडाउनमुळे नागरीकांना शनिवारी तसेच रविवारीही बाहेर फिरण्याच्या सवयीला ब्रेक लावावा लागला आहे. जिल्हाधिकारी डॉ.अमोल येडगे, यांनी नागरीकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

 

 

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!