राजूर येथे एका विवाहित युवकाने चुनाभट्टीचा चिमनीवरून उडी घेत केली आत्महत्या
वणी ( 17. फेब्रू ):- राजुर कॉलनी येथे एका विवाहित युवकाने चुनाभट्टीचा चिमणी वरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल रात्रीची आहे अशी प्रथम तपासात जवळपास आढळून आले .अमोल आनंद इंगोले ( वय .30) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.काल मंगळवार रोजी अमोल इंगोले हा रात्री घराबाहेर न सांगता निघून गेला व रात्रभर तो आलाच नाही.



सरतेशेवटी सकाळी नऊच्या दरम्यान त्याचा मृतदेह चुनखडी भट्याजवळ गावातील लोकांना आढळून आला. ही आत्महत्या नैराश्याने डोक्यात नकारात्मक विचारांची उत्पत्ति झाल्याने , कसलाही विचार न करता चुनाभट्टी वर गेला व तिथून उडी घेऊन स्वतःला संपविले .
अशी बाब प्रथमदर्शी तपासात आली आहे. पुढील तपास वणी पोलीस वासुदेव नारनवरे( जमादार )करीत आहे.या दुर्दैवी घटनेने राजुर गावात हळहळ व्यक्त होत आहे .विवाहित मृतक अमोल याच्या पश्चात पत्नी ,मोठा भाऊ व वहिनी असा आप्त परिवार आहे.





