Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजूर फाटा येथील पेट्रोलपंपचा कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार ?……

– मशीन मध्ये बिघाड असूनही काम पेट्रोल भरने मात्र सुरु, नेमका प्रकार काय ?…

वणी – यवतमाळ रोड वर असलेल्या भारत पेट्रोलियम नामक पंप येथे चक्क मशीन ठीक नसताना जर एखाद्याने 50 चे पेट्रोल टाकले तर त्याला 48 चेच येणार, मग एखाद्याने 200रु च टाकले की, त्याला सरळ या पेट्रोल पंप वरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते की, “भाऊ 198 च पेट्रोल येणार अरे असं कसं? अशी विचारणा केली असता तुम्हाला पटत असेल तर टाका मशीन दुरुस्त करण्याकरिता अजून कंपनीतून कोणी आले नाही ,असे सांगण्यात येत आहे”. अशी माहिती विदर्भ24ला प्रत्यक्षदर्शि यांनी माहिती दिली .

असे असून सदर पेट्रोल पंप मशीन नादुरुस्त असून पंप किंवा सदर मशीन बंद का बर ठेवत नाही हे सुद्धा कळायला मार्ग नसल्याने सर्व सामान्यांच्या मात्र खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. अशांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असून पेट्रोल पंप जनतेच्या सेवेसाठी की कर्मचाऱ्यांनी अरेरावी पणा करण्यासाठी? हाच प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

 अश्या प्रसंगी त्याच ”  एका पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्यांला विदर्भ 24न्यूज ने विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदर मशीन खराब आहे ते दुरुस्त करण्यास मालकाला  सांगीतले आहे परंतु ह्या मशीनने कधी जास्त ही पेट्रोल आम्ही देतो असे स्पष्ट माहिती त्यांनी दिली.”

महागाईने जनता मेटाकुटीला आलेली असताना त्यातही स्वतःचे खिसे भरण्याची संधी शोधणाऱ्यांची काही कमी नाही. मात्र वणी यवतमाळ रोडवरील राजूर फाट्या लगतच असलेले भारत पेट्रोलियम चे पेट्रोल पंप येथे अनागोंदी व्यवहार सुरू असून चक्क मशीन कशाने बिघाड आहे हेच मात्र कडेनासे झाले असून जर मशीन खराब असेल किंवा आकडे सेट नसेल होत तर सदर मशीन बंद ठेवायला हवी होती. मात्र ती मशीन सुरू असून त्यातून 50 चे टाकले तर 48 चे पेट्रोल येत असून यांवर कारवाई होणे गरजेचे झाले आहे. प्रत्यक्षदर्शि( ग्राहक ) कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता असे कसे तर त्यांचे उत्तर पटत असेल तर टाका असे मिळत असून पेट्रोल पंप ग्राहकांकरिता की, मनमर्जी धोरणांकरिता सर्व सामान्यांच्या खिशाला अगोदरच पेट्रोल दरवाढी मुळे चोट बसत असून अशा प्रकारच्या पंप धारकांवर संबंधित विभागाने कायदेशीर कारवाई करावी असाच सूर दिसत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!