Vidarbh24News

Latest Online Breaking News

*यवतमाळ जिल्हा पोलीसांच्या* *ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलीस* *अधीक्षक सरसावले*

यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशन च्या सर्व अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक मा.डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून शारीरिक व मानसिक स्वास्थ शिबिराचे आयोजन दि १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी चार दिवस करण्यात आले आहे या शारीरिक व मानसिक स्वास्थ शिबिराचे उद्घाटन आज दि १ फेब्रुवारी ला वणी येथे करण्यात आले सकाळी ७ वाजता वणी येथील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते झाले.या उद्घाटन कार्यक्रमाला संजय पुज्जाल्वार उपविभागीय पोलीस अधिकारी वणी. वैभव जाधव ठाणेदार पो.स्टे. वणी जगदीश मंडलवार ठाणेदार पो.स्टे.मारेगाव . मनोज केदारे.पोलीस निरीक्षक उपस्थित होते.सर्व प्रथम ठाणेदार वैभव जाधव यांनी पोलीस अधीक्षक मा.डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांचे स्वागत केले.या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन प्रा.डॉ.शिवाजी कुचे अमरावती यांनी केले.पोलिसांचे जीवन हे तणावात असतात त्याच बरोबर त्यांचे कुटुंबीय सुद्धा तणावात असतात या तणावातून मुक्तता मिळावी त्याच प्रमाणे कोरोना काळात पोलीस हे २४ तास कर्तव्यावर होते अनेक पोलीस बांधवाना कोरोनाची लागण झाली व अनेक पोलीस बांधवांचा कोरोनाने मृत्यू देखिल झाला अश्या परिस्थितीत सुधा पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य पार पाडले आपल्या कुटुंबाचा विचार न करता पोलीस कर्तव्यावर होते त्यामुळे पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबाचे ताण कमी व्हाव्हे या करीता पोलीस अधीक्षक मा.डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात हे शिबीर चार दिवस राबविण्यात येणार आहे प्रा.डॉ शिवाजी कुचे सर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांसाठी कोरोना काळात शिबीर घेवून पोलिसाना मार्गदर्शन केले होते यावेळी पोलीस अधीक्षक मा.डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी प्रा.डॉ शिवाजी कुचे सर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सूत्रत्रसंचालन पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणेदार वैभव जाधव यांनी केले या शिबिरात वणी उपविभागातील १०० पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!