Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथे पोलिसांच्या ताणतणावावर मात करण्यासाठी भव्य कार्यशाळेचे आयोजन

 – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या यांचा पुढाकार

 वणी :- यवतमाळ  जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून दि. 1 ते 4 फेब्रुवारी दरम्याम जिल्ह्यात शारीरिक व मानसिक स्वास्थ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.         

        या शारीरिक व मानसिक स्वास्थ शिबिराचे उद्घाटन आज दि. 1 फेब्रुवारीला वणी येथे सकाळी 7 वाजता सिद्धी विनायक मंगल कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला  उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, येथील ठाणेदार वैभव जाधव, मारेगाव येथील ठाणेदार जगदीश मंडलवार, पोलीस निरीक्षक मनोज केदारे उपस्थित होते. सर्व प्रथम ठाणेदार वैभव जाधव यांनी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे स्वागत केले. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून अमरावती येथील प्रा. डॉ. शिवाजी कुचे उपस्थित होते

उदघाटन पर मार्गदर्शन करताना डॉ. भुजबळ पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील पोलिसांचे शारीरिक स्वास्थ्य बरोबर मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे सुदृढ राहावे. पोलिसांना पूर्ण कार्यक्षमतेने काम करता यावे यासाठी जिल्ह्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांच्या सततच्या कामामुळे त्यांच्यावर कामाचा तणाव असतो. ध्यान धारणेमुळे पोलिसांच्या मनावरील ताणतणाव कमी होण्यास मदत होते.

त्यांची कार्यक्षमता वाढू शकते असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक मा.डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी प्रा.डॉ शिवाजी कुचे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

        पोलिसांचे जीवन हे तणावात असते. त्याच बरोबर त्यांचे कुटुंबीय सुद्धा तणावात असतात. या तणावातून मुक्तता मिळावी त्याच प्रमाणे कोरोना काळात पोलीस हे 24  तास कर्तव्यावर होते अनेक पोलीस बांधवाना कोरोनाची लागण झाली व अनेक पोलीस बांधवांचा कोरोनाने मृत्यू देखील झाले. अशा परिस्थितीत सुद्ध पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य पार पाडले. आपल्या कुटुंबाचा विचार न करता पोलीस कर्तव्यावर होते. 

त्यामुळे पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबाचे ताण कमी व्हावे या करीता  पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात हे शिबीर चार दिवस राबविण्यात येणार आहे. प्रा. डॉ. शिवाजी कुचे  यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांसाठी कोरोना काळात शिबीर घेवून पोलिसाना मार्गदर्शन केले होते. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणेदार वैभव जाधव यांनी केले. या कार्यशाळेत वणी उपविभागातील 100  पोलीस अधिकारी कर्मचारी  सहभागी झाले होते.

सर्व अधिकारी, अंमलदार यांचे शारीरिक मानसिक अध्यात्मिक क्षमता विकसित व्हावी. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यात सुसंवाद निर्माण व्हावा या उद्देशाने प्रा. डॉ. शिवाजी कुचे यांचे जिल्ह्यात 16 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.    या संधीचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील सर्व अधिकार, अंमलदार व कुटुंबीयांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे”.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!