हाथरस मधील हत्याकांडामध्ये सहभागी असणाऱ्यांना फाशी दया-कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची मागणी
हाथरस मधील हत्याकांडामध्ये सहभागी असणाऱ्यांना फाशी दया-कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची मागणी
आज दिनांक :- 05/10/2020 रोज सोमवारला म.रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ तालुका शाखा – सावलीच्या वतीने सन्माननीय- महामहिम राष्ट्रपती यांना उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित- मागासवर्गीय भगिनींवर झालेल्या अत्याचार व अमानुषपणे खून प्रकरणी पिडीत तरुणीला न्याय मिळवून देण्यासंदर्भात मान. तहसीलदार, सावली यांचेमार्फत निवेदन देण्यात आले.
सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून देशामध्ये वेळोवेळी दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजावर नेहमी अमानुष व क्रूर स्वरूपात अन्याय – अत्याचार केला जात आहे.. व या संदर्भात देशपातळीवर अजिबात दखल घेतली जात नाही.किंबहुना असे प्रकरण सोईस्करपणे दाबली जात आहेत..अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढले पाहिजे…
यास्तव पीडित दलित – मागासवर्गीय तरुणीला न्याय मिळून निर्घृण व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आरोपींना देहदंडाची शिक्षा लवकरात लवकर देऊन न्याय व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवावा जेणेकरून अशी प्रकरणे पुन्हा पुन्हा होऊ नयेत..म्हणून कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले…
याप्रसंगी म. रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ तालुका सावलीचे खालील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
मान. संदेश मानकर, अध्यक्ष मान.संतोष सिडाम महासचिव,
मान.किशोर लाडे कार्याध्यक्ष, मान.अशोक गावंडे जेष्ठ उपाध्यक्ष,
मान.अनंत दुधे कोषाध्यक्ष, मान.गुरूदासजी सिडाम संयुक्त सचिव, मान.धम्मपाल लाडे उपाध्यक्ष,
मान.प्रा.विजय गायकवाड मुख्य सल्लागार,
मान. आदेश मानकर कार्यालयीन सचिव,
मान.लंकेश मानकर सर आदी उपस्थित होते….

- See



