शहरातील जीर्ण इमारतीकडे सावली नगरपंचायतचे दुर्लक्ष
शहरातील जीर्ण इमारतीकडे सावली नगरपंचायतचे दुर्लक्ष
जिवितहानी झाल्यास जबाबदार कोण?
सावली शहरातील वार्ड नंबर ७ मध्ये निलकंठ हरी नारनवरे यांचे मातीचे घर आहे. घर पूर्णतः मोडकळीस आलेले आहे. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला रस्ता आहे. त्या रस्ताने घराशेजारील लोकं जाणे-येणे करतात व लहान मुले सुद्धा खेळत असतात. मागच्या वर्षी वार्डातील नागरिकांनी नगरपंचायतला याविषयी तक्रार केली व या वर्षी सुद्धा तक्रार केली परंतु ना नगरपंचायत या प्रकरणाकडे लक्ष देत आहे ना घरमालक लक्ष देत. त्या पडक्या घरात कोणीच राहत नाही.
दोन दिवसापूर्वीच सावली तालुक्यातील निफंद्रा गावातील दोन वर्षाच्या मुलाचा अशीच जीर्ण इमारत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तशीच परिस्थिती सावली शहरातील दिसत आहे. त्या जीर्ण इमारतीकडे ना नगरपंचायतचे लक्ष आहे ना घरमालकाचे. उद्या ती जीर्ण इमारत पडून कोणाची जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण नगरपंचायत की घरमालक? लवकरात लवकर ती जीर्ण इमारत पाडून तिची योग्य विल्हेवाट लावावी अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.



