Vidarbh24News

Latest Online Breaking News

न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी मी उभा : पालकमंत्री वडेट्टीवार

आदिवासी संदर्भात कोणतीही कारवाई वनविभागाने करू नये ;
न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी मी उभा : पालकमंत्री वडेट्टीवार
सिंदेवाही ( जि. चंद्रपूर ) दि ३१ जुलै : आदिवासींच्या अतिक्रमण संदर्भात कोणतीही दमदाटी अधिकारी करत असतील तर ते सहन करणार नाही. कायदा सोडून कोणी वागू नये. न्याय्य हक्कासाठी आपण आदिवासींच्या सोबत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.
सिंदेवाई तालुक्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आदिवासींच्या समस्या संदर्भात आलेल्या विविध तक्रारींना लक्षात घेतल्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सिंदेवाई तालुका काँग्रेस कार्यकर्ता यांची आज त्यांनी बैठक घेतली. शहरातील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कोणत्याही अधिकाऱ्यांकडून कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर लक्षात आणून द्या. सक्त कारवाई करू. आपण सत्तेत असतांना कायद्यापेक्षा कोणी मोठं होऊ नये, याची प्रत्येकाने नोंद घ्यावी.आदिवासी व स्थानिक लोकांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी ही सत्ता मिळाली आहे. त्यामुळे अशा कारवाईला लक्षात आणून द्या. आवश्यक ती कारवाई करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ना. विजय वडेटटीवार यानी आपल्या जनसंपर्क कार्यालय सिंदेवाही येथे तालुका कांग्रेस कार्यकर्ताची बैठक घेतली. या बैठकित शहरातील आणि तालुक्यातील सर्वच मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत नामदार विजय वडेट्टीवार यांनी शहरातील आणि तालुक्यातील विविध समस्यांचा आढावा प्रमुख कार्यकर्त्यांद्वारे जाणून घेतला. तसेच जनतेद्वारे देण्यात आलेले लेखी निवेदने सुद्धा स्विकारली. जनतेच्या ज्वलंत समस्यांवर संबंधित विभागाला आणि अधिकाऱ्यांना त्वरित यथाशीघ्र सर्व समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. तसेच सिंदेवाही तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील आणि बफरझोन मध्ये वसलेल्या वासेरा, शिवनी, पांढरवानी, पिपरहेटी, कारवा, इत्यादी गावाना प्रामुख्याने भेटी देवून त्या-त्या परिसरातील पीड़ित शेतकरी आणि बांबु व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीणाऱ्या कुटुम्बियाशी भेट घेवून त्यांच्या सुद्धा समस्या जाणून घेतल्या.
यावेळी ऐन पावसाळ्यात कथित अतिक्रमणधारक समजून शेतकरी म्हणून ज्यांचेवर कार्यवाही करण्यात आली, ज्यांच्या जमीनी बळकावण्यात आल्या,अश्या शेतकरी, शेतमजूर कुटुंबावर कारवाई करण्यात आली. त्यांनी आपली कैफियत मंत्रीमहोदय पुढे मांडली. पावसाळ्यात रोवणी झालेल्या या गरीब शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे या सर्व आदिवासी बहुल भागातील कुटुंबावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. अश्या अवस्थेत या कुटुंबावर कोणतेही संकट येवू या करिता त्यांनी या विषयी संबंधित वनविभाग अधिकारी, महसूल विभाग अधिकारी, इत्यादि संबंधित विभागाला त्वरित निर्देश देवून तात्काळ ही समस्या मार्गी लावावी आणि पीडिताना, सोशिताना यथाशीघ्र न्याय देण्यात यावा असे निर्देश दिले.
या बैठकीला तहसीलदार व अन्य विभागीय अधिकारी, तसेच नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, सभापती, विविध सहकारी संस्थानचे सभापती, कांग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ, कनिष्ठ, महिला आघाडी, इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!