चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं.2 हे गाव प्रतिबंधीत,
चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं.2 हे गाव प्रतिबंधीत,
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी/
चामोर्शी :- सध्या संपूर्ण भारत देशात संचारबंदी लागू आहे
अश्यातच बाहेर राज्यातून अनेक नागरिक गडचिरोली जिल्ह्यात मुंबई,पुणे,दिल्ली हैद्राबाद औरंगाबाद अश्या अनेक कोरोना चा कहर असलेल्या जिल्ह्यातून अनेक नागरिक गडचिरोली जिल्ह्यात परत आले असुन, काही लोकांना कोरोनाची बाधा झालेली दिसून आली, बऱ्यापैकी लोक कोरोना मुक्त झाले पण दिल्लीहून आलेला मुधोली चक न.2येथील 25 वर्षीय युवक याचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मुधोली चक न.2हे गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे , गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना पझिटिव्ह संख्या 65 बरे झालेलं रुग्ण 46 आणि आत्ता सक्रिय 19 आहेत, मुधोली चक न. 2 हे गाव प्रतिबंधीत झाल्याने परिसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, लोकांनी अती दक्षता घेणे आवश्यक आहे असे आव्हान जिल्हाधिकारी आ.दीपक सिंगला यांनी केले आहे..



