Vidarbh24News

Latest Online Breaking News

2016 मध्ये विभागीय स्पर्धा परीक्षेत पात्र झालेले 1285 पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती करा..

पोलीस बॉईज असोसिएशन शाखा गडचिरोली च्या वतिने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन,

गडचिरोली- सन 2016 मध्ये पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत पात्र झालेले 1285 उमेदवार यांना अजूनपर्यंत नियुक्ती आदेश दिलेले नाहीत, त्यामुळे या उमेदवारांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही, म्हणून या सर्व 1285 पात्र उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवेदनामध्ये असेही म्हटले आहे की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता शासनाची जर आर्थिक बाजू खराब असेल तर, हे सर्व 1285 उमेदवार आहे त्याच पदावरच्या वेतनावर नोकरी करण्यास तयार आहेत,परंतु त्यांना अगोदर नियुक्ती आदेश द्यावे. त्यांना पोलीस खात्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त आहे.त्यांना डायरेक्ट प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती आदेश देण्यात यावे. या करीता दिनांक 25 जून 2020 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोली जील्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फतिने महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले, या मागणीसाठी पोलीस बॉईज असोसिएशनने संपूर्ण महाराष्ट्रातून वारंवार निवेदने दिली, मोर्चे काढले, तसेच डिसेंबर 2019 नागपूर हिवाळी अधिवेशनात त्यावेळचे गृहमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनाही पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे मोर्चा काढून निवेदन दिले होते. तरीसुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या 1285 उमेदवारांना लवकरात लवकर प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती आदेश देण्यात यावे, अन्यथा पोलीस बॉईज असोसिएशन च्या वतीने महाराष्ट्रात तीव्र निदर्शने केली जातील असा इशारा पोलीस बॉईज असोसिएशन शाखा गडचिरोली जील्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष गिरीष कोरामी,यांनी केला आहे. निवेदन देताना उपाध्यक्ष आकाश ढाली,सचिव अक्षय उसेंडी,सहसचिव मनोज धरणी, कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत कोडापे,शहराध्यक्ष अभिलाष येनगनटिवार,शहर उपाध्यक्ष ओम प्रकाश वट्टी, प्रांतोष बिस्वास हे उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!