गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती,
गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती
विदर्भ 24 न्यूज
जिल्हाप्रतिनिधी / गडचिरोली :- मा.कुमार आशीर्वाद हे आय.आय.टी. खारंगपूर येथून बी.टेक. ( सिव्हिल इंजिनियर ) केले असून महाराष्ट्रातील आय. ए.एस. २०१६ च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांचे मीरा भायंदर येथील महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर स्थानानंतर झाले असून त्यांच्या जागी मा. कुमार आशीर्वाद यांची नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जिल्हा परिषद प्रशासनात सुसूत्रता आणून प्रशासकीय कामकाजाला व जिल्ह्याच्या विकासाला गती देतील, अशी अपेक्षा गडचिरोली जिल्हावासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



