Vidarbh24News

Latest Online Breaking News

*मानकापूर येथील निकृष्ट बंधारा बांधकामाची पालकमंत्र्यांनी घेतली दखल

*मानकापूर येथील निकृष्ट बंधारा बांधकामाची पालकमंत्र्यांनी घेतली दखल*
*सखोल चौकशीचे अभियंत्यांना आदेश*
मानकापूर येथील बंधाऱ्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी केली होती त्यानुसार उप अभियंता ननावरे यांनी कामाची चौकशी केली पण काहीच कारवाई न झाल्याने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहे
सावली तालुक्यातील मानकापूर व चारगाव येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी व पाणी जमिनीत मुरावे यासाठी नाल्यावर सिमेंट प्लग बंधारा बांधकाम जिल्हा परिषद जलसंधारण लघू सिंचाई विभागामार्फत ग्रामीण मजूर सहकारी संस्था भद्रावती यांना प्रत्येकी 13 लक्ष रुपये किंमतीचे काम मिळाले मात्र प्रत्यक्षात काम त्या भागातील पदाधिकाऱ्याचे नातेवाईकाने केले. बांधकामाचे मॉस काँक्रीटसाठी ४० एमएम तर आर सी सी साठी 20 एम एम गिट्टीचा वापर आहे परंतु जास्तीत जास्त40 एम एम गिट्टीचा वापर करण्यात आलेला आहे, पूर्ण क्रांक्रीट न करता मधोमध माती रेती भरलेल्या बॅगनी क्रांक्रीट पूर्ण करण्यात आलेला आहे. बांधकामासाठी १० फूट खोदकाम पोकलन मशिनद्वारे करण्यात आले परंतु दुसऱ्याच दिवशी जोराचा पाऊस आल्याने खोदकाम जैसे ते झाले त्याच्यावरच बंधाऱ्यांची पायाभरणी करण्यात आली, लोहा 3 फुटाचे तुकडे वापरून अत्यंत कमी वापर करण्यात आला अशी माहिती गावकऱ्यांकडून पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांना मिळाली होती. पाहणी अंती बंधारा बांधकाम बोगस झाल्याचे आढळल्याने कोरेवार यांनी चौकशीचे निर्देश दिले. उप अभियंता ननावरे, कनिष्ठ अभियंता गंधे यांनी चौकशी केली यादरम्यान निकृष्ट कामास निस्तारण्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू होते. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने तहसिल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत हे प्रकरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे लक्षात आणून दिली. याची दखल घेत मानकापूर व चारगाव येथील बंधाऱ्यांची सखोल चौकशीचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!