वणीतील दोन व्यक्ति कोरोना पॉझिटीव्ह
file photo
वणीतील दोन व्यक्ति कोरोना पॉझिटीव्ह
11 लोक कोरंटाईन सेंटरला रवाना
नागपुरच्या रुग्णालयात हलविले..
अखेर वणीमधे कोरोना पॉजिटिव रुग्ण सापडले. कालपासून विविध चर्चेला ऊधाण आले होते. मात्र प्रशासनाने अधिकृतरित्या दोन रुग्ण जाहिर केल्याने परिसरात एकच खड़बड उडाली आहे. सध्या पॉझिटीव्ह रुग्णावर नागपुर येथे उपचार सुरु आहे.
सूत्रानुसार मिळालेली माहिती, दिनांक 9 जून रोजी मुंबईहून एक कुटुंब वणीत आले. त्यांच्यामधे कोरोनाचे लक्षण दिसल्याने त्यातील दोन व्यक्तींना तपासणी करिता नागपुरला नेल्या गेले. त्यांचा रेपोर्ट कोरोना पॉझिटीव्हव आला .आजपर्यंत कोरोनाचा शिरकाव न झालेल्या वणीत बाहेरील व्यक्ति कोरोना पॉजिटिव निघाल्याने कोरोना आता पसरेल काय? अशी भीती शहरवासियांमध्ये निर्माण झाली आहे. वणी शहर व तालुका कोरोनामुक्त असल्याने लोक बिनधास्तपणे वावरत होते. परंतु ही बातमी ऐकताच सर्व सुन्न झाले आहे. प्रत्येक व्यक्ति एकमेकांना फोन करुन याबाबत माहिती घेताना दिसत आहे. प्रशासनाने येथील रहिवाशी असलेले व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे सुरु केले आहे व अन्य सदस्याना पडसोनी येथील कोविड केअर सेंटर मधे तपासणी करिता नेण्यात आले आहे.



