Vidarbh24News

Latest Online Breaking News

चितळाची शिकार ; चार आरोपी ताब्यात ; सूकवासी वनक्षेत्रातील घटना

चितळाची शिकार ; चार आरोपी ताब्यात ; सूकवासी वनक्षेत्रातील घटना

चंद्रपूर :–मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत सुकवाशी बिटात शिकारी कुत्र्यांचा मदतीने चितळाची शिकार केल्याची घटना उघळकीस आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने चार आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.ही घटना मध्य चांदा वनविभाग वनपरीक्षेत्रातील सूकवाशी बिटात घडली आहे.विशेष म्हणजे दोन महीण्यापुर्वी या वनक्षेत्रात शिकारीची घटना उघडकीस आली होती.
चंद्रपूर- मध्य चांदा वनविभाग वनपरीक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या सूकवाशी बिटातील कक्ष क्रमांक 156 मध्ये शिकारी कुत्र्यांचा मदतीने चितळाची शिकार केल्याची माहीती वनविभागाला मिळाली.माहीतीच्या आधारे वनविभागाने नितेश मेश्राम,नारायण पंदीलवार,सिताराम कातलाम,शंकर कोडापे या चौघांना ताब्यात घेतले. आरोपींनी दिलेल्या माहीतीचा आधारे वनविभागाचे अधिकारी यांनी शिकारीचे घटनास्थळ गाठले असता तिथे चितळाचे मुंडके,तूटलेले पाय आढळून आले. शिकार प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. काही महीण्यापुर्वी सूकवाशी बिटाला लागुनच असलेल्या वटराणा वनक्षेत्रात सांबराची शिकार झाली होती. वेडगाव येथेही शिकारीची घटना उघळकीस आली होती. धाबा वनक्षेत्राअंतर्गत शिकारीचा घटना वाढल्याने वन्यप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
वन्यजीव असूरक्षित….!
धाबा वनक्षेत्र वन्यजीवांचे महत्त्वाचा भ्रमणमार्ग समजला जातो. दूर्मिळ प्रजातीचा वन्यजीवांचा येथे आवास आहे. मागील वर्षी या वनक्षेत्रातील तिन वाघ दगावले. शिकारीचा अनेक घटना उघळकीस आल्या आहेत. वनविभागाचा कामचूकारपणामुळे वन्यजिव असूरक्षित झाल्याचा आरोप वन्यजिव प्रेमिंकडून केला जात आहे.वनविभागाने वेळीच उपाययोजना करणे काळाची गरज आहे.वारवांर शिकारीचे प्रमाणात वाढ होत असून वनविभाग गंभीर असल्याचे दिसून येत नाही.असे मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!