Vidarbh24News

Latest Online Breaking News

चकपिरंजी येथिल महिलांनी पकडली गावठी दारू

चकपिरंजी येथिल महिलांनी पकडली गावठी दारू
:- सावली तालुक्यातील चकपिरंजी येथील बचत गटाच्या महिलांनी गावात अवैध दारूविक्री करणाऱ्या दारूविक्रेत्या कडून 40 लिटर मोहफुलची दारू पकडली असून गावात अवैध दारू विक्रेत्यांना चांगलीच तंबी दिलेली असून दारूबंदी साठी  एक पाऊल उचलले आहे.
चकपिरंजी येथे अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले असल्याने गावातील दारुबंदी करण्याच्या दृष्टीने तीन दिवसा अगोदर गावातील युवक जेष्ठ मंडळीला घेऊन जे जे गावात दारू विकत आहेत त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन यानंतर तीन दिवसांनी दारू विक्री बंद करा असे सुचविण्यात आले परंतु दारू विक्रेत्याने दारू विकणे सुरूच ठेवले. गावात पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सुद्धा आले परंतु काही झाले नाही शेवटी महिला मंडळीने पुढाकार घेत आज चकपिरंजी मेन रोड, शाळेची टोळी, देऊळ टोळी येथील दारू विक्रेत्याच्या घरी धाळ टाकून 40 लिटर दारू जप्त केली. दारूबंदीच्या दृष्टीने महिलांनी उचललेल्या पाऊलाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!