ढिवर समाजाची मागणी
नगर पंचायत कडे ढिवर समाजाची मागणी
*सिंदेवाही* – ढिवर समाजाला मासोळी विकण्या साठी असलेली जागा कोराना काळात नगर पंचायतने बदलवुन शेतातील एका बांधीत दिली होती. नुकत्याच झालेल्या पावसामुळे त्या जागेवर जिकडे तिकडे चिखल झाल्यामुळे ती जागा मासोळी विकण्या साठी अडचणीची झाली. समाजातील लोकांनी मासोळी विकायसाठी तलावाच्या पाळीवर बसून मासे विकणे चालू केले. पण ही जागा अरुंद असल्या मुळे फार अडचणी आहे .पाळीच्या एका बाजूला १०-१५ फुट खोल शेतातील बांधी आहे व दुसर्या बाजूला तितकेच खोल तलावातील पाणी आहेत त्यामुळे तीथे अपघाताची भीती आहे. त्यामुळे नगर पंचायतने मासोळी विकण्या साठी जुन्या परंपरागत जागेवर जाऊन विकायची परवानगी द्यावी ही विनंती करण्यात येत आहे.



