*मायबाप सरकार तारीख वाढवा हो!*
*धान विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा, मात्र नोंदणी होईना.*
सावली: धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा सहकारी सोसायटी (फेडरेशन) मध्ये दरवर्षी प्रमाणे नोंद करावी लागते. एक नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. एवढात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानाला प्रति हेक्टरी विस हजार रुपये देणार असे विधान सभेत जाहीर करताच या नोंदणी प्रक्रियेला जोर आला. गेल्यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंद केली किंवा नाही केली, त्या सर्वांनाच 20 हजार रुपये प्रति हेक्टरी देण्यात आले.
त्यामुळे यावर्षी जवळपास सर्वच शेतकरी नोंदणी करण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र सावली तालुक्यात फक्त पाचच नोंदणी केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. शेतकरी सकाळी सात वाजता येतात दिवसभर उन्हातानात राहून सुद्धा नोंदणी होत नाही आहे. 111 गावाचा भार फक्त 5 केंद्रावर असल्यामुळे आणि तेही एका आयडी वर किंवा एका मोबाईल वर एकच व्यक्ती नोंद करीत असल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे फार्म कसा भरायचा असा, प्रश्न नोंदणी करणाऱ्याला पडतआहे, तर शेतकरी नोंदणी करण्यासाठी आठ दिवस येऊन सुद्धा नोंदणी होत नसल्याने हवालदिल होत आहेत. कधीकधी तांत्रिक अडचणीमुळे सुध्दा शेतकऱ्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
*अद्याप 50 टक्के शेतकरी वंचित*
सुरवातीला नोंदनीची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत होती. ती मुदत सरकारला अर्ज विनंत्या करून 31 डिसेंबर करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत 50 टक्के शेतकऱ्यांची नोंद झालेली नाही. याच पद्धतीने नोंदणी होत राहिल्यास आणखी एक महिन्याने मुद्दत वाढवून सुद्धा काहीच उपयोग होणार नाही. त्यासाठी नोंदणी करणाऱ्या व्यक्तीची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
*आपले सरकार सेवा केंद्रात सुविधा द्या*
आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रांना सुविधा दिली असती तर केंद्रावर येरझाऱ्या मारण्याची गरज नसती. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्र असल्याने हे काम गावपातळीवर झाले असते. शेतकरी आपआपल्या सोईनुसार व्यवस्थित नोंदणी केले असते. सर्व शासकीय योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने होतात परंतु, नोंदणीचे फार्म मोजक्याच यंत्रणेकडे असल्याने अडचणी येत आहेत.
* मी मागिल आठ दिवसा पासून सकाळी उपासी तापासी येऊन सुद्धा माझी अजून पर्यंत नोंद झाली नाही. नोंद करण्यासाठी आजचाच दिवस शिल्लक आहे. सरकारने तारीख वाढविण्यापेक्षा नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढवावी.*
*सुनिता गावळे महिला शेतकरी*
पेंढरी मक्ता*



