दिपक बोलीवार यांचा मरणोपरांत सत्कार सोहळा व आदरांजलीचा कार्यक्रम संपन्न
रुपचंद लाटेलवार यांची प्रदेशाध्यक्ष पदी तर
प्रदेश महिला संघटीका पदी निलिमा बोलीवार यांची निवड
गडचिरोली: अन्यायाविरोधात सतत झटणारा, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांसाठी प्राणपणाला लावणारा एक अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता दिपक बोलीवार यांचे १४ एप्रिल २०२३ ला निधन होते. त्यानिमित्य त्यांच्या स्वगावी डोंगरगांव येथे शनिवारला जाहीरपणे सन्मान सोहळा करून आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.

त्यांच्या आई वडिल व पत्नी चा सुद्धा गौरव करून त्यांच्या दोन मुलींच्या पुढील भवितव्याच्या विचार करून विविध संघटनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली.
जो व्यक्ती प्रामाणिकपणे समाजासाठी झटतो, त्याच्यासाठी समाज सुद्धा झटतो हे आजच्या कार्यक्रमातून संदेश समाजापुढे मांडण्यात आला.
स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास..!!
या म्हणीप्रमाणे दिपक बोलीवार आयुष्यभर सामजिक कार्यासाठी आपल्या तब्बेतीची काळजी न करता कुणावर अन्याय झाल्यास धाऊन जात होते. समाज बांधवांना नेहमी मदत करीत होते. त्यांच्या कामाची पावती म्हणून शेवटी शेवटी त्यांना बुध्द भूषण पुरस्कार देण्यात आला.

अखिल भारतीय मादगी समाज संघटनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. रुपचंद लाटेलवार यांची प्रदेशाध्यक्ष पदी, प्रदेश महिला संघठिका पदी निलिमा बोलीवार, चंद्रहास ईटकलवार तालुका अध्यक्ष पोंभुर्णा, सौरव जिल्हेवार तालुका .प्रभारी मुल, कालिदास लाटेलवार शहर अध्यक्ष गडचिरोली, गजू आलेवार चंद्रपूर शहर प्रमुख म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
या आदरांजली व सन्मान सभेला अध्यक्ष म्हणून मोहन देवतळे, विशेष अतिथी म्हणून शिवसेना सह संपर्कप्रमुख विलास कोडापे, बुद्धिस्ट सोसायटीचे प्रवक्ते धर्मानंद मेश्राम, उपाध्यक्ष ऍड. सोनाली मेश्राम, कोशाध्यक्ष विभा उमरे, धम्मराव तानादू, डॉ. दिलीप बारसागडे, बीआरएसपी महिला प्रदेश सह संयोजिका पूनम घोनमोडे, विवेक मुन, विजय देवतळे, राज बन्सोड, प्रतीक डांगे, प्रितेश अंबादे, लक्ष्मण मोहुर्ले सल्लागार, रुपचंद लाटेलवार प्रदेशाध्यक्ष, आकाश आलेवार प्रदेश सचिव, अनिल बोटकावार जिल्हाध्यक्ष, शामराव झिलपेल्लीवार जिल्हा उपाध्यक्ष, वनिता पोहरकर महिला जिल्हाध्यक्षा गडचिरोली, निलिमा बोलीवार प्रदेश महिला संघटिका, प्रमोद कारेवार सिंदेवाही तालुका अध्यक्ष, रमेश लाटेलवार सावली तालुका अध्यक्ष, सुनिल नल्लूलवार, सौरव जिल्हेवार तालुका .प्रभारी मुल, किशोर नरूले जिल्हा संघटक, कालिदास लाटेलवार शहर अध्यक्ष गडचिरोली, गजू आलेवार शहरप्रमुख, चंद्रहास ईटकलवार तालुका अध्यक्ष पोंभुर्णा, बबनराव गोरंतवार सामाजिक कार्यकर्ते, राजेशजी कलगटवार सामजिक कार्यकर्ते, श्रीकृष्ण कोरेवार, कुंदन घोगरे, संघरक्षित बांबोळे, गावचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, इतर गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटीं दिपक बोलीवार अमर रहे ! अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



