महाराष्ट्रातील काँग्रसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन
रात्री २ वाजता घेतला अखेरचा श्वास
३१ मे ला ११ वाजता वरोरा येथे अंतिम संस्कार
महाराष्ट्रातीलकाँग्रेसचे एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर यांचं निधन झालं आहे. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी एयर अॅम्बुलन्सद्वारे त्यांचं पार्थिव आणण्यात येईल. यानंतर उद्या वरोरा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती 28 मे रोजी अचानक बिघडली होती. धानोरकर यांना एयर अॅम्बुलन्सद्वारे नागपूर येथून नवी दिल्लीत उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. याआधी त्यांच्यावर नागपुरात खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली होती..
2 दिवसांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना आतड्याचे इन्फेक्शन झाले. त्यावर अधिक उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने रवाना करण्यात आले होते.
बाळू धानोरकर 47 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सौम्य सुधारणा होत असल्याचं वृत्त काल समोर आलं होतं. मात्र, पहाटेच त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
बाळू धानोरकर हे आधी शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर ते कॅाग्रेसमध्ये गेले आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. राज्यात कॅाग्रेसचे चे एकमेव खासदार होते.
चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं. बाळू धानोरकर यांनी वडिलांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं होतं. पण, भद्रावती येथे झालेल्या अंतीम संस्काराला बाळू धानोकर हे उपस्थित राहू शकले नाही. कारण त्यांची स्वतःची प्रकृतीदेखील चांगली नव्हती. शेवटी बाळू यांचे भाऊ अनिल धानोरकर यांनी वडिलांच्या पार्थिवावर अंतीम संस्कार केले.
चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून हवाई मार्गे नागपूर येथे व तिथून वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव आज 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर 31 मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल.अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली



