*विश्वशांती विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे ०१ मे महाराष्ट्र दिन कामगार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलभाऊ स्वामी यांचे हस्ते संपन्न झाले.
महाराष्ट्राच्या मातीत संत तुकाराम,संत रामदास,संत ज्ञानेश्वर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यासारखे अनेक संत होऊन गेलेत त्यांनी एक चांगला संदेश महाराष्ट्राला दिला. महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जनजागृतीचे काम केले त्यांनी आपल्या लेखनातून संपूर्ण विश्वाला चांगला संदेश दिला असे माणसे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आली हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे असे विचार विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी प्रास्ताविकेतून मांडले.मंचावर प्रमुख पाहुणे मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ.विजय शेंडे,पर्यवेक्षक अरुण राऊत,सहाय्यक शिक्षक सुधाकर मेश्राम,शेखर प्यारमवार,संजय ढवस,किशोर संगिडवार उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.राजू झोडे यांनी केले तर आभार प्रा.धनंजय गुरनुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



