Vidarbh24News

Latest Online Breaking News

जेईई मेन्स परीक्षेत समर लाडेचे सुयश

सावली: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षेचे निकाल शनिवारी घोषित झाले. या परीक्षेत माउंट ज्युनिअर सायन्स कॉलेज सावलीचा विद्यार्थी समर भास्कर लाडे उतीर्ण झाला असुन जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरला आहे..

एप्रिल महिन्याच्या ६, ८, १०, ११, १२, १३, १५ रोजी जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा झाली, ज्यामध्ये देशभरातून जवळपास ९ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. जेईई मेन्सच्या पहिल्या सत्रातील निकालाप्रमाणे नागपूरसह विदर्भाच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्राच्या परीक्षेतही दमदार कामगिरी केली आहे.

एनटीए मार्फत दरवर्षी दोनदा जेईई मेन्स परीक्षा घेण्यात येते . त्या परीक्षेमधून जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी विद्यार्थी पात्र होतात . जेईई ॲडव्हान्स परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आयआयटी मध्ये प्रवेश मिळतो . जेईई मेन्स परीक्षेच्या गुणावरुन एनआयटीमध्ये प्रवेश मिळतो .

समर ने आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद व आपल्या आई-वडिलांना दिले आहे. समरचे वडिल वकिलीचा व्यवसाय करतात.

यावर्षी देशभरातून सुमारे साडेनऊ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स ही परीक्षा दिली . त्यापैकी सुमारे अडीच लाख विद्यार्थी ॲडव्हान्स साठी पात्र झाले .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!