Vidarbh24News

Latest Online Breaking News

मंदिराच्या अधिष्ठान , जलाभिषेकाच्या कार्यक्रमात स्वामी मृर्लीधार महाराजाची उपस्थिति …….

सावली ( लोकमत दुधे )
देवस्थानच्या मंदिराचे निर्माण कार्य पुर्ण होण्यासाठी व जीर्णोद्धारासाठ सर्व मंदिर समितीच्या धर्माचार्यांशी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची चर्चा होणार असून ५ मे पासून १५ मे पर्यंत महादेव जागृती अधिष्ठान तर १५ मे ला मार्कंडा देवस्थान येथे होणार जलाभिषेक होणार असून सदर मंदिराच्या कार्यात सावली तालुक्यातील पारडी हरणघाट येथील स्वामी मुर्लिधर महाराज यांची उपस्थिति राहणार आहे. विदर्भातील काशी समजल्या जाणऱ्या या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील देवस्थान , मंदिर कार्याच्या पूर्णत्वासाठी सर्व मंदिरातिल मुख्य पूजा ऱ्याना कार्यक्रमादरम्यांन पाचारण करण्यात आले आहे.
मागील अनेक वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून मार्कंडा देवस्थानचे दुरुस्तीचे काम सुरु असून ते काम थांबलेले आहे. ते थांबलेले काम पुर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र अजूनही मंदिर काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे हे काम पुर्ण व्हावे व त्यामध्ये येणारे अडथळे दूर व्हावे यासाठी हिंदु परंपरेनुसार देवी-देवतांचे भगवान महादेवाचे जागृती अधिष्ठान व जलाभिषेक कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी दिली.आमदार डॉ देवरावजी होळी यांनी यासंदर्भात मार्कंडा देवस्थानचे पदाधिकारी, मंदीर परिसरातील पुजारी , तालुक्यातील मंदिरांचे धर्माचार्य, भक्त भावीक यांच्यासोबत मार्कंडा देवस्थान बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीला संघाचे जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा, उपविभागीय अधिकारी श्री तोडसाम साहेब, तहसीलदार नागटिळक, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजाननजी भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, श्री मुरलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान हरणघाट पारडी ट्रस्टचे अध्यक्ष परमपूज्य संत श्री मुरलीधर महाराज, तसेच गायत्री परिवाराचे दीनानाथ गवारे, रामप्रसाद महाराज मंदिराचे नानाजी बुरांडे, इस्कॉन मंदिर कृष्णनगरचे महाराज, तालुक्याचे अध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, कोमेरवार सर , लोमेश बुरांडे ,सावसाकडे सर , प्रेमा आईंचवार, मनीष गांधी, हरीश गांधी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, जेष्ठ नेते जयरामजी चलाख, अमोल महाराज आमगावकर, हनुमान मंदिर चामोर्शी येथील अनिल महाराज चलाख, तालुका महामंत्री भोजराज भगत, अमोल आईंचवार, यश गन्यारपवार, मंदिर परिसरातील सर्व पुजारी धर्माचार्य व तालुक्यातील भक्त भाविक प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे
मार्कंडा देवस्थानचे दुरुस्ती व पुनर्निर्माण करण्यासाठी २०१४ पासून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून मंदिर खोलण्यात आले. मात्र ८-९ वर्षाचा कालावधी होऊनही अजूनपर्यंत या मंदिराचा अर्धाही भाग पूर्ण झालेला नाही.
त्यामुळे या संदर्भात काही धार्मिक अडीअडचणी येत असल्यास त्या धार्मिक विधी करून दूर करण्याची आवश्यकता असून त्याकरीता हिंदू परंपरेनुसार हिंदू देवी देवतांचे व महादेवाचे जागृती अधिष्ठान व जलाभिषेक करणे आवश्यक असल्याची कल्पना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मांडली. या संदर्भात चर्चा केली असता परमपूज्य संत श्री मुरलीधर महाराज यांनी स्वतः ५ मे ते १५मे पर्यंत स्वतः हजर राहून अधिष्ठान व जलाभिषेक चा कार्यक्रम पार पाडण्यात येईल असे त्यांनी आपले मत व्यक्त केले तरीही सर्व भाविक भक्तांनी या होणाऱ्या कार्यक्रमास आपली उपस्थिती देऊन महाराजांना संयोग करावा व त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी मिळून या कार्यक्रमास सहकार्य करावा असी विनंती केलि जात आहे …….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!