*विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
प्रतिनिधी :प्रा.शेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये विश्वरत्न,महामानव,अर्थतज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय रवींद्र मुप्पावार सर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक मिलिंद सूपले,शेखर प्यारमवार, डी.यू.दुधे,सहाय्यक शिक्षक किशोर संगिडवार,श्वेता खरचे, मंचावर उपस्थित होते.

जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक प्रा.देवानंद दुधे यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला तसेच विद्यालयाचे सहायक शिक्षक प्रदीप कोहळे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्याकडून भाषणे आणि गीत सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे धनंजय गुरनुले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.



