Vidarbh24News

Latest Online Breaking News

*राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात फुले – आंबेडकर जयंती

*राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात फुले – आंबेडकर जयंती साजरी*
प्रतिनिधी:प्रा.शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे समान संधी केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ दिवाकर उराडे व प्रा. महानंदा भाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक खोब्रागडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतीक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानाचा वारसा विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा आंबेडकरांचे अनेक क्षेत्रातीलील कार्य उल्लेखनीय व अत्युच्च पातळीवरच आहे संविधान निर्मितीमधील त्यांचेे योगदान सर्वोच्च असून भारतीय समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले आहे.तर डॉ. दिवाकर उराडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित , पिढीत , शोषित , वंचित घटकाला न्याय देण्याचं कार्य केले आहेत असे विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समान संधी केंद्राचे सदस्य प्रा.संदिप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय योजना कार्यक्रमाधिकारी डॉ रामचंद्र वासेकर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. विनोद बडवाईक यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. दिलीप कामडी, प्रा संगानंद बागडे , डॉ.प्रेरणा मोडक, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी प्रा. प्रशांत वासाडे , डॉ. भाष्कर सुकारे, प्रा.देविलाल वाताखेरे, डॉ. राजश्री मार्कंडेवार, प्रा दिलीप सोनटक्के, डॉ. प्रफुल्ल वैराळे, डॉ. विजयसिंग पवार प्रा.प्रकाश घागरगुंडे डॉ. किरण बोरकर, प्रा. मुकेश निखाडे प्रा.आशिष शेंडे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!