*खर्या आदिवासींचे उलगुलान
२० मार्च ला आझाद मैदानावर आंदोलन
*आदिवासी जमातीत बोगस घुसखोरी व विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी दिनांक 20 मार्च 2023 आझाद मैदान मुंबई येथे उलगुलान आंदोलन करण्यात येणार आहे.
दि 6 जुलै 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने खर्या आदिवासींच्या जागी खोटे सर्टिफिकेट मिळवून बोगस आदिवासींनी बळकावलेला जागा रिक्त करून खऱ्या आदिवासींची पदभरती कराव. या निकालाचा राज्य शासनाने अवमान करून बोगसांना वाचविण्यासाठी अधिसंख्य पदाचा शासननिर्णय काढून त्या माध्यमातून दि 29 नोव्हें 2022 रोजी अधिसंख्य केलेल्या बोगसांसाठी संरक्षण देणारा कायदा मंजूर करून दि 14 डिसेंबर 2022 रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा व सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अमलबजावणी करून खऱ्या आदिवासींची पदभरती करावी व खोटे सर्टिफिकेट घेउन खऱ्या आदिवासींच्या जागा बळकावणारयांवर गुन्हे दाखल करावे,
धनगर जातीचा आदिवासी जमातीत समावेश करू नये, शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची वाढलेल्या महागाईमुळे डी बी टी 7 हजार ते 8 हजार रुपयेने वाढ करण्यात यावी व 3 महिने अगोदर डी बी टी मिळावी अन्यथा डी बी टी पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे खानावळ सुरू करावी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागु असलेली पंडित दीनदयाळ स्वयंम योजनेत वाढलेल्या महागाईमुळे 10 हजार ते 12 हजार रुपयेने वाढ करण्यात यावी, अनुसूचित क्षेत्रातील पेसा शिक्षक पदभरती व इतर विभागातील पेसा पदभरती करावी, आदिवासींची 2017 सालाची रखडलेली विशेष पदभरती करावी, सह्याद्रीतिल अनुसूचित क्षेत्रातील कसारा घाटाला आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे नाव द्यावे,
सह्याद्रीतल्या अनुसूचित क्षेत्रातील भावली धरणाला आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर नाव द्यावे, वीर बाबुराव शेडमाके यांच असलेले स्मारक गडचिरोली शहरात सन्मानाने बसवावे, आदिवासींची स्वतंत्र जणगणना करावी, आदिवासींना स्वतंत्र धर्मकोड 7 देण्यात यावा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मुंबई ,पुणे,नागपुर,औरंगाबाद,अमरावती नाशिक अशा मोठ्या शहारांमध्ये निवासी एम.पी.एस .सी / यु.पी.एस.सी. प्रशिक्षण केंद्र सुरु करावे, मरांग गोमके जयपालसिंग मुंडा यांचा इतिहास राज्यातील सर्व विद्यापीठातील अभ्यासक्रमात घ्यावा, आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, 2 वर्षापासुन काही विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळालेला नाही तो लाभ सरसकट तात्काळ मिळावा, वसतिगृह डी बि टी चा लाभ विद्यार्थ्यांना वेळेवर मिळालेला नही तो सरसकट तात्काळ मिळावा, जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वाढीव वस्तीगृह सुरू करून क्षमता 500 मुलांची व क्षमता 300 मुलीचि प्रवेश संख्या वाढविण्यात यावी, तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वाढीव वसतिगृह सुरू करून क्षमता 300 मुलांची व क्षमता 200 मुलींची प्रवेश सन्ख्या वाढविण्यात यावी, शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ घेताना वय 27 मर्यादित असलेली वयाची अट रद्द करावी, दरवर्षी फक्त पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मर्यादित 20 हजार विद्यार्थ्यांना मिळतो तर ती मर्यादा रद्द करून शिक्षणापासून वंचित राहणार्या सर्व विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ फक्त शहराकरिता शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मिळत असून तो पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ तालुका स्तरावर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मिळावा, नर्सिंगचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ घेताना कॅप राऊंड ची अट रद्द करून विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळावा, शासकीय वसतीगृहात प्रवेश घेताना अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष संपुनही शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना कॉलेज कडून मोठ्या प्रमाणात मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश झाल्यावर एक महिन्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, आदिवासी विकास विभाग मंत्रालय शासन निर्णय दि 11/11/2011 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून आदिवासी विकास विभागाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्या, राज्यातील सर्व सेंट्रल किचन बंद करून आश्रमशाळांमध्ये पूर्वीप्रमाणे जेवण बनविण्यात यावे, आदिवासी जमातीची संस्कृती टिकवून ठेवणार्या आदिवासी जमातीच्या सर्व प्रकारच्या कलाकारांना मानधन सुरू करावे, अनुसूचित क्षेत्रात पेसा पदभरतीत बिगर आदिवासींचा समावेश न करता 100 टक्के आदिवासींची पदभरती करण्यात यावी, नागपुर येथे गोंडवाना सांस्कृतिक सांस्कृतिक संग्रहालय सुरू करावे, शबरी वित्त महामंडळ मधून आदिवासी तरुणांना 10 लाख रुपये पर्यन्त बिनव्याज कर्ज द्या*
या सर्व समस्या सोडविण्यासाठी दि 20 मार्च 2023 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे खऱ्या आदिवासींचे उलगुलान (आंदोलन ) करण्यात येणार आहे तरी राज्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव,अतुल डी कोडापे युवा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांनी केले आहे.



