गुरांच्या गोठयात गळफास लावून आत्महत्या
सिंदेवाही तालुक्यातील कळमगांव गन्ना येथील मुखरू वासुदेव मगरे वय 36 वर्ष या इसमाने गुरांच्या गोठयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली सविस्तर वृत्त असे आहे की कळमगांव गन्ना येथील रहिवासी मुखरू मगरे हा इसम मंगळवार ला सकाळी 6 वाजता दारुच्या नशेत गुरांच्या गोठयात गळफास लावून आत्महत्या केली। या घटनेची माहिती सिंदेवाही पोलिस स्टेशन ला मिळताच सिंदेवाही चे ठानेदार तुषार चव्हाण, भास्कर ठाकरे पीएसआय व पोलिस कर्मचारी घटना स्थळी पंचनामा करुन मृतकाचा चा शव ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे आणन्यात आला शवविच्छेदन करुन गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरणाचा तपास ठानेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कोवे करीत आहे.