Vidarbh24News

Latest Online Breaking News

सिंदेवाही तालुक्यात हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

सिंदेवाही तालुक्यात हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

हत्तीरोग उच्चाटण करण्याच्या अनुषंगाने हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ जिल्हयातील सिंदेवाही येथुन करण्यात आला हि मोहिम १० फेब्रुवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२३ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. मोहिमेचे उदघाटन नगरपंचायत येथे तहसिलदार मा. श्री. गणेश जगदाळे यांनी प्रत्यक्ष गोळया खाऊन केले. या मोहिमेकरीता ४४७ जणांची चमू व ४५ पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे.कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणुन सिंदेवाही नगरपंचायत चे नगराध्यक्ष मा. स्वप्निल कावळे तसेच मयूर सूचक उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक तसेच तालुका आरोग्य अधिकारी मा. श्री. डॉ. प्रफुल सुने श्री. सुनिल हेमके आरोग्य पर्यवेक्षक श्री.कमलेश चव्हाण हिवताप तांत्रिक पर्यवेक्षक श्री. महाजनवार आरोग्य सहाय्यक, श्री. मोहुर्ले/ श्री. शेंडे आरोग्यसेवक आदी उपस्थित होते.सिंदेवाही तालुक्यातुन हत्तीरोग हृददपार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवक, यांच्या कडुन देण्यात येणा-या गोळ्यांचे सेवन त्यांच्या समक्ष करण्याचे आवाहन मा. नगराध्यक्ष व तहसिलदार साहेब यांनी समस्त जनतेला केले.

 

 

 

 

 

तीन प्रकारच्या गोळयांचे वितरण

या मोहिमेदरम्यान तीन प्रकारच्या गोळया देण्यात येणार आहेत. आयव्हरमेक्टीन ही गोळी उंचीनुसार, डि.ई.सी. गोळी वयानुसार, अल्बेंडाझोल हि गोळी प्रत्येकी एक याप्रमाणे दयायची आहे. या गोळयांचे सेवन २ वर्षाखालील बालकांनी गरोदर मातांनी, सात दिवसांच्या स्तनदा मातांनी आणि अती गंभीर आजारी व्यक्तींनी करु नये. या गोळया उपाशीपोटी घेऊ नये असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी सांगितले आहे. सर्वांनी आपल्या घरी येणा-या कर्मचा-यांना सहकार्य करुन गोळयांचे सेवन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल सुने यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!