*पारडी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी
*पारडी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी*
प्रतिनिधी:
प्रत्येक मानवाने आपले जीवन सुसंस्कारमय व आदर्शमय घडविण्यासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ पारडी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वा पुण्यतिथी महोत्सव सर्व संत स्मुर्ती महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.
तीनदिवसीय कार्यक्रमामध्ये ध्यानपाठ,ग्रामसफाई,महिला मेळावा,रांगोळी स्पर्धा,ग्रामगीता वाचन स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,गितगायन स्पर्धा घेण्यात आली.संत श्री मुरलीधर महाराज,हरणघाट यांचे शुभहस्ते घटस्थापना करण्यात आली.तसेच भजन,कीर्तन आणि समाज प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून गावात जनजागृती करण्यात आली.

सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आजीवन प्रचारक , प्रा.मिलिंद सूपले,प्रा.शेखर प्यारमवार,हजारे सर,मुक्तेश्वर राजूरकर,बावणे महाराज, पि. टी. पारधी,मुख्याध्यापक खोब्रागडे यांचे मार्गदर्शन लाभले.
समारोपीय दिवशी संपूर्ण पारडी नगरातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पालखी(रामधून) काढण्यात आली.यामध्ये पारडी,रुद्रापुर, उसेगाव,चांदापुर,पालेबारसा, भद्रावती,तुकुम,खेडी, चिमढा, हिरापुर,भवराळा,चिखली,डोंगरगाव,निमगाव,निफंद्रा,येथील गुरुदेव भक्त तसेच गावातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.ह.भ.प.श्रावण डाखरे महाराज भद्रावती यांच्या किर्तनाने गोपालकाला करण्यात आला.यावेळी ह.भ.प.मिरगे महाराज भद्रावती यांचेकडून गावातील गरीब विद्यार्थी,महिला व पुरुष यांना वस्त्रदान करून माणुसकीचे दर्शन घडविण्यात आले.
महोत्सवाच्या शेवटी सर्व –
धर्म प्रार्थना व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.आणि राष्ट्रवंदना घेण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील पुरुष, महिला,युवक मंडळी, बाल- गोपाल,गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व समस्त गावातील जनतेचे सहकार्य लाभले.



