Vidarbh24News

Latest Online Breaking News

अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधावी – मुकेश कोमलवार

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोढोली येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तथा शाळा स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सव म्हणून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्याचबरोबर या शाळेतून शिकून गेलेले माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन सध्याच्या विद्यार्थांना मिळावे या उदात्त हेतुने माजी विद्यार्थी सत्कार सोहळा तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन २७ जानेवारी २०२३ रोज शुक्रबारला करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन उष्टु पेंदोर सरपंच ग्रा. प. लोंढोली सह उद्घाटक प्रमोद खोबे उपसरपंच संजयराव दुधबळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उपस्थितीत होते.


दिपप्रज्वलन करून समारंभ तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती निरे मुख्याध्यापक यांनी केले कार्यक्रम प्रसंगी उद्‌घाटक, तसेच अध्यक्ष महोदय यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर सत्कार समारंभ करण्यात आले. सत्कार समारंभास माजी विद्यार्थी म्हणून तुकाराम गोवर्धन काशिनाथ भडके, वसंतराव गेडाम पुरुषोत्तमजी बोदलकर, सुरेशराव संगोजवार, गुरुदेव बोदलकर मुकेश कोमलवार सत्कारमुर्ती म्हणून उपस्थीत होते.मुकेश कोमलवार यांनी आपल्या मनोगतात या शाळेत शिकत असतानाचा अनुभव, परिस्थिती त्याचबरोबर स्पर्धेच्या युगात विद्यार्थी म्हणून कशी तयारी करावी. आणि येणाऱ्या काळात पुढे जायचे असेल तर सर्व गोष्टी बाजुला ठेवून शैक्षणिक वाटचाल कशी करावी या बाबत सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. त्याचबरोबर गावाची प्रगती करायची असेल सर्व तर एकजुटीने राहून आपल्या गावाचा पर्यायाने शाळेचा एक चांगला विकास करता येईल. शिकत असलेल्या विदयार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून शैक्षणिक कार्यात चांगली कशी प्रगती करता येईल. अशा मनोध्य आदरणीय महोदययांनी व्यक्त केला. त्याचबरोबर शिक्षकांनीसुद्धा आपले कार्य चांगले करून गावात आपला मान राहील यासाठी पुरेपूर प्रयत्ल करावेत यश आपल्या सोबत राहील असेही मार्गदर्शन केले.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये वैयधिक नृत्य, सामुहीक नृल, नक्कल, नाटीका असे अनेक प्रकारचे बोधात्मक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरीक, माता- पालक युवक-युवती आणि सर्व विद्यार्थी तसेच समस्त ग्रामवासी उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन माधव मानगुडधे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनिल चुनारकर यांनी केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!