Vidarbh24News

Latest Online Breaking News

वाघाच्या दहशतीत गेले तालुका वासियांचे मावळते वर्षे …..

वाघाच्या दहशतीत गेले तालुका वासियांचे मावळते वर्षे ……..
………………………………
* संपादकीय *
लोकमत दुधे / बाबा मेश्राम
………………………………
* वर्षभरात ३२ जख्मी तर ५ जन ठार *
* वनविभागाची माहिती *
* वाघाची दहशत कायम *
तालुका तसाही धानपिक उत्पादनासाठी अग्रेसत यात धानपिका सोबतच रब्बी हंगामातील तुर ,कापुस,कडधान्य पिक सुध्दा घेतले जाते मात्र तालुक्यातील बहुतांश शेतीजमीन हि जंगलव्याप्त भागा लगत असल्याने जंगली प्राण्यांच्या सहवास शेतशिवारात दिसून येतो, या जंगलात वाघ,बिबट, रान डुक्कर, हरीण ,ससे, निलगाय ,कोल्हे आदी जंगली प्राण्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात दिसून येते, परंतु जंगलालगत शेती असल्याने शेतकरी ,मजुर आपल्या शेतात काम करण्यासाठी जातात,अशा वेळेस या जंगली श्वापदाचा मोठा त्रास ग्रामीण जनतेला होत आहे,त्यामुळे शेतातील पिकांची मोठी नासाळी त्यामुळे धानपिकाची मोठी नुकसान त्यातही वारंवार वाघ ,बिबटचा हल्ला या शेतकऱ्यांवर होत असल्याने वर्षभरात ५ लोकांना आपला जिव गमवावा लागला तर ३२ लोक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे तालुक्यातील जंनतेचे मावळते वर्ष हे वाघाच्या दहशतीतच गेले असेच म्हणावे लागेल. वर्षाच्या अखेरच्या महिन्यात तालुक्यातील निलसनी पेठगाव येथील कैलास गेडेकर हा शेतकरी वाघाच्या हल्यात ठार झाला तर रुद्रापुर येथील बाबुराव बुधा कांबळे हा शेतकरी वाघाच्या ठार झाला, तर खेडी येथील स्वरुपा प्रशांत येलट्टीवार हि महिला मजुर म्हणून कापून वेचणीसाठी गेली असता ती सुद्धा वाघाची शिकार ठरली ,तालुक्यात अखेरच्या महिन्यात ३ लोकांना आपला जीव गमवावा लागला तर वर्ष भरात वाघाच्या हल्ल्यात ५ लोकांना जीव गमवावा लागला तर वर्षभरात विविध श्वापदाच्या हल्ल्यात ३२ लोक जखमी झाले,
वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मुत्यु झाला , तर याला दोष मुत्यु मुखी पडलेल्या शेतकऱ्याचा का ? असा यक्ष प्रश्न तालुका वासीया समोर .आवासुन.उभा असताना अशा गंभीर बाबींकडे आणि वन्य जिवांच्या हौदासाकडे कुठेतरी सम्बंधित विभाग कमी पड़त असल्याचे दिसुन येते त्यामुळे वन्यजीवांचा संरक्षण, संवर्धन याकडे वनविभाग अपयशी ठरत असल्याचे म्हणने वावगे ठरु नये,त्यामुळे वन्यजीवाचे हल्ले वाढल्याचे दिसत आहे, अशातच तालुक्यातील
लोक प्रतिनिधी सह जनता आक्रमक झाली आणि ,वाघाला जेरबंद करा अशी मागणी करु लागले, तालुक्यातील वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव द्यावा लागत असल्याचे पाहून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाला आदेश देऊन नरभक्षी वाघाला जेरबंद करा,अन्यथा निलंबनाची कारवाई करु,त्यामुळे भयभीत वनविभाग कामाला लागले ,कॉमेरे, पिंजरे सोबतच शुटर घेऊन तालुक्यातील पाचही उपवनाचे कर्मचारी डोळ्यात अंजन.घालून वाघाला जेरबंद करण्यासाठी मेहनत करु लागले.
वाघाच्या सातत्याने वाढत असलेल्या हल्यामुळे तालूका परिसरात मोठी दहशत.निर्माण झाली असून आता तर बाहेर शौचास जाणे कठीण होऊ बसल्याने गावागावात भातीचे वातावरणात निर्माण झाले आहे त्यामुळे शेतात,जंगलात ,गावात रहावे.कसे.असा प्रश्न उभा ठाकत आहे
वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे मोठी दहशत निर्माण झाली असून वन्य जीवांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत असली तरी वाघाची दहशत कायम असल्याने मावळते वर्ष वाघाच्या दहशतीत गेले जात आहे हे विशेष त्यामुळे मावळत्या वर्षाचा शेवटचा महिना शेतक ऱ्यासह मजूर आणि इतर वर्गासाठी कर्दन काळ ठरला असला तरी केवळ वाघाच्या दहशतीत एका वाघाला जेरबंद करुण चालणार नाही तर इतरही वाघाचा आनी वन्य जीवांचा बंदोबस्त करावा जेणेकरून सामान्य जनतेत वन्य जीवां बाबतची दहशत कमी होईल ….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!