वाचनालयाला पुस्तके दान देऊन वाढदिवस साजरा
सावली नगरातील प्रतीष्टीत व्यापारी श्री. देवानंद वासूदेव सोनूले यांच्या मुलगा आयुष याचा वाढदिवस महात्मा जोतीराव फुले वाचनालयास पुस्तके देऊन साजरा करण्यात आला. आयूषच्या हस्ते पुस्तके व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले . यावेळी देवानंद सोनूले यांनी वाचनालयातील विद्यार्थ्यांना कसल्याही अडचणी आल्यास त्या सोडवीन्यास मी सदैव तत्पर राहील असे मत व्यक्त केले . पुस्तकांचा स्वीकार वाचनालयाच्या वतीने प्रदिप लेनगूरे , नितेश रस्से वाचनालयाचे स्वयमसेवक रवी वाढई , महेश मांदाळे , महेश गुरनूले, सुरज आवळे, भास्कर शेंडे यावेळी बहुसंख्य वाचक उपस्थित होते.



