Vidarbh24News

Latest Online Breaking News

व्हॉईस ऑफ मिडियाव्दारे पत्रकार दिन सोहळा संपन्न

*व्हॉईस ऑफ मिडियाव्दारे पत्रकार दिन सोहळा संपन्न
प्रतिनिधी:
व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा व शहर कार्यकारिणी च्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन सोहळा सिद्धार्थ हॉटेल चंद्रपूर येथील सभागृहात संपन्न करण्यात आला.
पत्रकार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुनीलजी कुहिकर हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक,जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे,शहर अध्यक्ष सारंग पांडे उपस्थित होते.


याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर,चंद्रपूर प्रेस क्लब चे अध्यक्ष संजय तायडे,ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर,सावली तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार यशवंत डोहने यांचा पत्रकारिता क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच व्हॉईस ऑफ मीडिया च्या पदाधिकाऱ्यांना संघाच्या वतीने १०लाख रुपये रकमेचा विमा प्रदान करण्यात आला.तसेच येणाऱ्या काळात पत्रकारांच्या मुलांना मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती,अपघात विमा,तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन,पत्रकार निवास अशा प्रकारची उद्दिष्ट्ये पार पाडण्यात येणार आहेत.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया सावली चे अध्यक्ष प्रवीण झोडे,उपाध्यक्ष डॉ.शेखर प्यारमवार,सरचिटणीस उमेश गोलेपल्लिवार,कोषाध्यक्ष नितीन गोहने,कार्यवाहक रुपचंद लाटेलवार,संघटक टीकाराम म्हशाखेत्री,प्रसिद्धी प्रमुख सौरव गोहने,सदस्य गिरीश चिमूरकर तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा,राजुरा,जिवती मुल,सिंदेवाही,तालुक्यातील अध्यक्ष तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉईस ऑफ मीडिया चे जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन विनायक रेकलवार तर आभार अमर बुद्धारपवार यांनी मानले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!