Vidarbh24News

Latest Online Breaking News

*जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांची विधानभवनावर पेन्शन संकल्प यात्रा*

*जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांची विधानभवनावर पेन्शन संकल्प यात्रा*

महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी यांना 1982/84 ची जुनी पेन्शन योजना बंद करून शेअर मार्केटवर आधारित nps योजना लागू केलेली आहे. ज्यात पेन्शनची कुठलीही हमी नाही. यामुळे 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी यांच्यात महाराष्ट्र शासनाविरुद्ध कमालीचा असंतोष दिसून येत आहे. Nps योजनेतील 3000 च्या वरती कर्मचारी आज मृत झालेले आहे तरी त्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही त्यांचे परिवार आज हलाखीचे जीवन जगत आहेत. या सर्व मृत कर्मचारी आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी यांना 1982/84 चीच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून गेल्या 7 वर्षांपासून वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना लढत आहे. 19 डिसेंबर 2022 ला हिवाळी अधिवेशन सुरु झालेले आहे या अधिवेशनावर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पेन्शन संकल्प यात्रा काढत असून या यात्रेचे स्वरूप तीन टप्प्यात असून पहिला टप्पा 25 डिसेंबर 2022 बापू कुटी सेवाग्राम ते बुटीबोरी बाईक रॅली, दुसरा टप्पा 26 डिसेंबर 2022 बुटीबोरी ते खापरी पायी पेन्शन मार्च, तिसरा टप्पा 27 डिसेंबर 2022 खापरी ते नागपूर विधानभवन पायी पेन्शन मार्च असे आहे. नुकतीच जुनी पेन्शन योजना लागू केल्यास शासनावर दिवाळखोरी ची वेळ येईल असे अधिवेशनात मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा संघटनेकडून निषेध करण्यात येत असून येत्या निवडणुकीत voteforops या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन सरकारला वठनीवर आणूया तत्पूर्वी पेन्शन संकल्प यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सावली तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
19:10