माजी मंत्री व आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आज मानव-वन्यजीव संघर्ष संदर्भात मुख्य वनसंरक्षक व वनविभागाच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक व वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या व्यक्तींचा घरी सांत्वनपर भेट घेऊन त्यांना आधार दिला……..
माजी मंत्री व आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आज मानव-वन्यजीव संघर्ष संदर्भात मुख्य वनसंरक्षक व वनविभागाच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक व वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या व्यक्तींचा घरी सांत्वनपर भेट घेऊन त्यांना आधार दिला……..
सावली ( लोकमत दुधे )
सावली तालुक्यात या हफ्त्यात अनुक्रमे नीलसनी पेठगाव, रुद्रापूर व खेडी येथे वाघाच्या हल्यात निर्दोष व्यक्तींचा जीव गेला.सर्वत्र हाहाकार उडाला.जन सामान्याचे जीवन विस्कळीत आले.सकाळ आणी संद्याकाळी वाघाच्या भीतीमुळे दहशतीमुळे घराबाहेर निघणे कठीण झाले.विदयार्थी,शेतकरी बेहाल झाले.जंगल व ग्रामीण भागातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण झाले.
त्यांचा वाली कोण ? हा प्रश्न जनतेने सरकार समोर मांडले असताना राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे पुढे सरसावले आहेत.त्यांनी वन विभागातिल अधिकारी यांची पंचायत समिती सावली येथे बैठक घेतली त्यात. श्री.लोणकर(सी.सी.फ), श्री.खाडे ( डी.फ.ओ) चंद्रपूर व श्री.विरुटकर(आरफओ,सावली ) तथा सावली तहसीलचे नायब तहसीलदार श्री.सागर कांबळे, यांना वाघाना जेरबंद करण्यासाठी सूचना दिली.गावशीवरात कोणत्याही वन्यप्राण्यांची घुसखोरी व त्यामुळे होणारी टाळण्यासाठी लवकरात लवकर वनविभागातर्फे उपाय योजना करण्याचे सांगितले.यांचदरम्यान वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या कुटुंबाना त्यांनी सांत्वना देत मोठ्या भावाप्रमाणे आधार दिला. रुद्रापूर येथील श्री.बाबुराव कांबळे, खेडी येथील सौ.स्वरूपा येल्लटीवार व निलसनी पेठगांव येथील श्री.कैलास गेडेकर हे वाघाच्या हल्यात मृत पावले होते.आज त्यांचा कुटुंबाना त्यांनी भेट देत आधार दिला.या वेळी वनविभागातर्फे मिळणारे २० लक्ष रुपयापैकी ५ लाख रुपयांचा धनादेश मृतकांच्या कुटुंबियांना त्यांनी सुपूर्त केला.या वेळी श्री.संदीप गड्डमवार,माजी उपाध्यक्ष जि.प.चंद्रपूर,श्री.विजय कोरेवार,माजी सभापती प.स.सावली, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, सावली शहराध्यक्ष विजय मुत्यलवार, नितीन दुव्वावार,निखिल सुरमवार ,मुन्ना स्वामी चक्रधर दुधे, श्रीकांत बहिरवार, नगरसेवक नितेश रस्से तथा पिंटू गड्डमवार व कमलेश गेडाम तथा रुद्रापूर खेडी, सावली व निलसनी पेठगांव या त्या गावातील स्थानिक नेते, कार्यकर्ते व गावातील लोक उपस्थित होते ……



