Vidarbh24News

Latest Online Breaking News

*बोगस आदीवासी हटाव संदर्भात आदीवासी संघटनेचा मोर्चा धडकला तहसिल कचेरीवर*

*बोगस आदीवासी हटाव संदर्भात आदीवासी संघटनेचा मोर्चा धडकला तहसिल कचेरीवर*

+हजारो आदीवासी बांधवाची उपस्थित+
+विविध समस्येची केली मागणी+

*तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याना दिले निवेदन-

*सावली*(बाबा मेश्राम/लोकमत दुधे)-अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली व विविध आदिवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बोगस आदिवासी वर कारवाई करण्यात यावी, या संदर्भात धडक मोर्चाचे आयोजन शुक्रवार रोजी करण्यात आले, यावेळी आदीवासी संघटनेचे केशव तिराणीक ,गुलाब मडावी, जनार्दन गेडाम ,अतुल कोडापे, बापुजी मडावी, जितेश कुळमेथे,अशोक उईके,तुकाराम गेडाम, महिपाल मडावी, प्रदीप गेडाम, कुणाल कोवे प्रविण गेडाम, योगिता पेंदाम, लखन मेश्राम, यशवंत ताडाम,क्रिष्णा कन्नाके, एकनाथ कन्नाके, राजु कोडापे, लखन मेश्राम, युवराज उईके,आदी आदिवासी बांधव उपस्थित होते.धडक मोर्चाची सुरुवात आदिवासी वस्तीगुहा पासुन करण्यात आली ,सोबतच सावली शहराच्या मुख्य मार्गाने तहसील कचेरीवर नेण्यात आला ,

तहसील कार्यालया समोर छोटेखानी कार्यक्रमातुन मोर्चाच्या मुख्य मागण्या मुल ,सावली,सिंदेवाही या तालुक्यातील वरठी,धोबी यांनी नामेसा धर्माचा फायदा घेत धोबा करून आदीवासींच्या सवलती लाटण्याचा जात चोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह धोबा जमात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करणे,6 जुन 2017नुसार बोगस आदीवासींना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत त्या सर्वोच्च न्यायालयीन निकालाची त्वरीत.अमंलबजावणी. करण्याबाबत ,जे अधिकारी जमात निहाय योग्य शहानिशा न करता बोगस जात प्रमाणपत्र प्रदान करतात अशा अधिका-यावर.फौजदारी गुन्हा सह सेवेतून निष्कासित करावे, चंद्रपूर जिल्हामधील भुमीहीन.लोकांचे संरक्षण करून मोफत शासकीय जमीन देण्यात यावे, आदिवासी अतिक्रमीत शेतकऱ्यांना विनाअट तात्काळ जमीनीचे पट्टे देण्यात यावे,संविधानातील 5 व 6 व्या अनुसुचीची अमंलबजावणी करण्यात यावी,गैर आदिवासी खोटे जातप्रमाणपत्र सादर करून 12500 पदे बडकावली आहे ,ते पद रद्द करून ख-या आदींवासी चा समावेश करावा, अशा विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
धडक मोर्चाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.युवा जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे,तालुका अध्यक्ष प्रविण गेडाम, यासह गोंडवाना संघटना, बिरसा दल,बिरसा क्रांती, बिरसा ब्रिगेड,आफरोट,इंडियन ट्रायबल व्हालेंटिअर ,आग्रनेशनन ,जागर,अशा संघटना व कर्मचारी वर्ग उपस्थित होते…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!