जय सहकारची छत्रीच” मतदारांना आधार बनेल…

वणी :-जनतेने नव्याने आलेल्या या विरोधकांना साथ न देता जय सहकार पॅनलच्या छत्री या बोधचिन्हवर फुलीचा शिक्का मारून विजयी करण्याचे आव्हाहन पॅनलच्या उमेदवाराकडून करण्यात आले आहे. संस्थेचा विकास जर हवा असेल तर जय सहकार पॅनलशिवाय पर्याय नाही. विरोधकांच्या खोट्या व फसव्या प्रचाराला बळी न पडता आपले बहुमूल्य मत हे जय सहकार पॅनललाच द्यावे.
अनेक जिल्ह्यात संस्थेच्या 22 शाखा निर्माण करण्यात आल्या. करोडो रुपयांचे कर्ज देऊन संस्थेच्या उत्पन्नामध्ये मध्ये वाढ करण्यात यश मिळविले. जय सहकार पॅनेलमध्ये अनुभवी उमेदवारांना सामील करण्यात आले आहे.
पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीला सुरुंग लावण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला असून त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. कारण मतदार राजा जागृत आहे. त्यांना या पतसंस्थेच्या प्रगतीची वाटचाल माहिती आहे. पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीचे आजही अनेक जन साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांच्या या आरोपांमुळे मतदारांचा कौल बदलेल, ही विरोधकांची खुळी समजूत झाली असल्याचे खुद्द मतदारांमधूनच ऐकायला मिळत आहे.
आरोप प्रत्यारोप करून यशस्वी धोरणांवर पांघरून घालता येत नाही. त्यामुळे २६ जूनला होणाऱ्या निवडणुकीत सहकार क्षेत्राला जय करणारं जय सहकार पॅनलच विजयी होईल, हा विश्वास मतदारांमधून व्यक्त होत आहे.