Vidarbh24News

Latest Online Breaking News

चंद्रपूर कोरोना अपडेट चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१ वर

ब्रेकिंग न्युज

चंद्रपूर कोरोना अपडेट

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१ वर

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सांयकाळी आणखी दोन रुग्णांची त्यामध्ये भर पडली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे २३ मे रोजी रात्री १५ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मध्यरात्री नंतर वाढून १९ झाली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मे च्या रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यापैकी दोन रुग्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आहेत. तर दोन रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत.
१. यामध्ये मुंबईवरून आलेला मौजा वरवट येथील पंचवीस वर्षाच्या युवकांचा समावेश आहे. हा युवक 17 मे रोजी अन्य सहा लोकांसोबत मुंबईवरून चंद्रपूर येथे आला होता. या युवकाला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. 22 मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला होता.
२. घुगुस येथील पंचवीस वर्षीय महिला 14 मे रोजी पुण्यावरून आली होती. ती होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे दिसून आल्यामुळे 22 मे रोजी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली. 22 रोजी या महिलेचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.
३. नाशिक मालेगाव येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील मूल तालुक्यातील चिरोली येथील २७ वर्षीय व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या युवकाचा स्वब नमुना 22 मे रोजी घेण्यात आला होता.
४. पुण्यावरून आलेल्या 28 वर्षीय दुर्गापूर येथील युवक होम कॉरेन्टाइन होता. 21 ला लक्षणे दिसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाला होता. 22 मे रोजी या युवकाचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.
या चारही युवकांचे स्वॅब नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या १९ पैकी १८ रुग्ण चंद्रपूरमध्ये आहेत. पाहिला रूग्ण कोरणामुक्त झाला आहे.
चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) आणि २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) या चार तारखांना आतापर्यंत १९ रुग्ण पॉझिटीव्ह ठरले आहेत.

माध्यमांच्या माहितीसाठी
जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!