Vidarbh24News

Latest Online Breaking News

सिंदेवाहीच्या तहसिलदाराचे नागरिकांना सामाजिक अंतर पाळण्याचे आव्हान

सिंदेवाहीच्या तहसिलदाराचे नागरिकांना सामाजिक अंतर पाळण्याचे आव्हान

सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा या गावामध्ये दोन कोरोनाबधित रुग्ण आढळून आल्यामुळे सध्या तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.माझे सर्वाना आवाहन आहे की या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये..सिंदेवाही तालुक्यातील पहिला कोरोना बाधित बाहेर जिल्ह्यातून आलेला असून सदर मुलाला गावस्तरीय समितीने वेगळ्या घरात ठेवूनही त्याच्या संपर्कात सदर मुलगी आल्याचे दिसून येते..यावरून प्रशासनातर्फे सामाजिक अंतर ठेवण्याचे जे आवाहन वारंवार करण्यात येत आहे त्याचे महत्व अधोरेखित होत आहे..
तरी सिंदेवाही तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की बाहेरील जिल्ह्यांमधून आलेल्या व्यक्तींची माहिती तात्काळ स्थानिक प्रशासनाला दयावी.. गृह व संस्थात्मक विलगिकरन केलेल्या व्यक्तीपासून सामाजिक अंतर(social distance) ठेवावे..महसूल,पोलीस , नगरपंचायत ग्रामविकास व सर्व प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे..तसेच सर्व पत्रकार बांधवाना विनंती आहे की प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीत एखादी उणीव राहिली असेल तर तात्काळ ती लक्षात आणून द्यावी..त्या गोष्टीचा उहापोह न करता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे व या आपत्ती मध्ये आपला सहभाग नोंदवावा ही विनंती…
सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता मा.जिल्हाधिकारी व आरोग्य विभागातर्फे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे….
गणेश जगदाळे
तहसीलदार,सिंदेवाही.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!