अत्यावश्यक सेवेत फोटोग्राफी हा व्यवसाय आणावा ,लॉकडाऊन मुळे त्रस्त फोटोग्राफरचे शासनाला केली मागणी- सना फोटो स्टुडिओचे संचालक इरफान अली
वणी (17 एप्रिल) :- राज्यातील सर्व शासकीय कार्यालये सुरू आहेत. सर्व सामान्य नागरिकांची विविध कामे छायाचित्रण अभावी रखडत आहे. बँक, खरेदीविक्री तसेच शेती व्यवसायासाठी, घरकुल योजना, वन विभाग, कोर्ट इत्यादी ठिकाणी जनतेस पासपोर्ट फोटो किंवा 4×6 च्या फोटोची आवश्यकता असते, सर्वच कार्यालयीन कामासाठी पासपोर्ट फोटो ची आवश्यकता आहे.

तरी फोटोग्राफी हा व्यवसाय अत्यावश्यक सेवेत आणावा अशी मागणी सना फोटो स्टुडिओ चे संचालक इरफान अली यांनी शासनाला ला केली आहे.
मागील एक वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने अनेक वेळा लॉक डाऊन लावण्यात आला. यामुळे विवाह समारंभ बंद आहे, दुकानाचे काम बंद असल्याने माणसाचे पगार दुकांनभाडे, वीज बिल, आणि घरखर्च या अडचणी फोटोग्राफर समोर आहेत जमा बचतीतून वर्षभरातील भाडे भरणे व इतर खर्च भागविणे सुरू आहे.
कर्जावर घेतलेले कॅमेरे त्याचे मासिक हप्ते भरण्यासाठी सुद्धा कसरत करावी लागत आहे. सध्यस्थीतीत दुकान खाली करणे किंवा कुणाकडून कर्ज घेऊन दुकानाचे भाडे
जमा करणे या द्विधा मनस्थितीत फोटोग्राफर व्यावसायिक जगत असल्याचे अली यांनी स्पष्ट केले. शासनाने लॉक डाऊन च्या कालखंडात फोटोग्राफरची दुकाने
कोविड नियमाच्या अधीन राहून अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.



