स्व.स्वातंत्र सेनानी प्रल्हादराव रेभे यांचे पुत्र रवि रेभे यांची IHRAO च्या तालुका अध्यक्षपदी निवड….
★ वणी उपाध्यक्ष म्हणून सचिन मराठे व सचिवपदी शारिक शेख़ यांची निवड
वणी (7.एप्रिल ):– इंटरनॅशनल हुमन राईट अम्बेसेडर ऑर्गनाझेशन (IHRAO) च्या वणी तालुका अध्यक्ष पदी भाजप व्यापारी आघाडीचे उत्कृष्ट शहर उपाध्यक्ष रवी रेभे यांची निवड अध्यक्षपदी करण्यात आली व सचिवपदी शारिक शेख करण्यात आली आहे.
मागील एक वर्षातील लाॅकडाऊनच्या काळात, त्यांनी केलेली गोरगरिबांना मदत तसेच लाॅकडाऊनच्या काळात उचलेला सामाजिक कार्याचा भार हा संपुर्ण तालुक्यात उल्लेखनीय असल्याचे बोलले जात होते.
त्यामुळे रवी रेभे यांची अध्यक्ष पदी व सचिव पदी शारीक शेख यांची निवड करण्यात आली आहे. यांची निवड हुमन राईट ॲब्ससार्डोस ऑर्गनाझेशन(IHRAO) चे जिल्हा अध्यक्ष प्रा.अजय कंडेवार यांनी केली .
पारंपारिक सुरु असलेला सामाजिक कार्याची परंपरा स्व. स्वातंत्र्य सेनानी स्व.प्रल्हाद रेभे यांच्या पासुन मिळालेला वारसा असल्याचे रवी रेभे यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या निवडीने संपुर्ण तालुक्यातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



