राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-19 लसीकरनाची सुरुवात
वणी( 22 मार्च ): राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते उद्घाटन करून लसीकरनास सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग,यवतमाळ तर्फे जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवात झाली आहे.या अनुषंगाने राजूर येथे आमदार मा.संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते उद्घाटन करून सोहळा पार पडला.लगेच सामान्य जनतेस लसीकरण सुरू झाले.
उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून वणी पंचायत समिती सभापती मा.संजय पिंपळशेंडे, राजूर ग्राम पंचायत सरपंच विद्या पेरकावार,उपसरपंच अश्विनी बलकी, जिल्हा परिषद सदस्य संघदिप भगत, वणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गायणार ,वणी तालुका आरोग्य अधिकारी विकास कांबळे,पं. स.वणी माजी सभापती वसुंधरा गजभिये,माजी पं. स. सदस्य अशोक वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न। झाला.
आठवड्यात सोमवार,बुधवार,शुक्रवार या 3 दिवस लसीकरणाचा लाभ 60 वर्ष वरील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केन्द्र,राजूर अधिकार डॉ. चिखलीकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घाडगे, कोयरे ,गजभे ,बलकी , रेड्डीवार ,अंकलवार सिस्टर,रुईकर सिस्टर,साखरे सिस्टर,मांडवकर सिस्टर,
खामनकर सिस्टर,हस्ते, कुचनकर , सुनील तांबेकर सर्व कर्मचारी व आशा सेविका यांनी सहकार्य केले.



