Vidarbh24News

Latest Online Breaking News

यवतमाळ येथे जिल्ह्याचे भाजपा नेते मदन येरावार व नितिन भुतडा( जिल्हाध्यक्ष यवतमाळ भाजपा )यांचा  धड़ाकेबाज नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा भ्रष्ट आणि अनैतिक कारभाराचा निषेध आंदोलन…

यवतमाळ( 21.मार्च ) :– आज दि.21.3.2021 यवतमाळ येथे जिल्ह्याचे भाजपा नेते मदन येरावार व नितिन भुतडा (जिल्हाध्यक्ष भाजपा यवतमाळ) नेतृत्वाखाली आंदोलन करुन संवेदनाशून्य,भ्रष्ट आणि अनैतिक कारभाराचा निषेध नोंदवित महावसूली आघाडीच्या संवेदनाशून्य, भ्रष्ट आणि अनैतिक कारभाराचा निषेध नोंदवत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे .

गृहमंत्री यांनी स्वतःच सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते’ असे मुंबई चे माजी पोलीस आयुक्त श्री परमबीर सिंग यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत.गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था राखणं ज्यांची जबाबदारी होती त्यांनीच वसुलीचे रॅकेट चालवण्याचे आरोप तेही खुद्द तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले आहेत. लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास अबाधित रहावा यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं आणि सदरील आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे.एकीकडे सर्वसामान्यांना वाढीव वीजबिल पाठवून सावकारी वसुली चालू आहे. कोव्हीड केअर सेंटरची वीज कापण्यापर्यंत निष्ठुरता झिरपली आहे. तर दुसरीकडे गृहमंत्र्यांच्या आशिर्वादानेच वसुली रॅकेट चालू आहे. आज यवतमाळ येथे यवतमाळ जिल्ह्याचे नेते  मदन  येरावार नितिन भुतडा (जिल्हाध्यक्ष भाजपा यवतमाळ) नेतृत्वाखाली आंदोलन करुन संवेदनाशून्य, भ्रष्ट आणि अनैतिक कारभाराचा निषेध नोंदवला.या वेळी आमदार अशोक उईके, आ. नामदेव ससाने,आ.निलय नाईक, रवि बेलुरकर(जिल्हा महामंत्री)  , राजु पडगिलवार, दत्ता राहणे, यवतमाळ शहर अध्यक्ष प्रशांत येदव जिल्हा सचिव, शंकर लालसर जिल्हा भाजपा यवतमाळ चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता बंधू उपस्थित होते.एक मात्र खरे आहे; महाविकास आघाडीतील विकास हा विकास नसून ‘वसुली’ आहे!

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!