चक्क…..45 लाख रुपयांच्या बॅगेवरच अनोळखी व्यक्ति डल्ला मारीत रफुचक्कर
वणी( 21 .मार्च ):– वणीसह दिवसाढवळ्या चोरीच्या घटना जोर धरत असताना छोट्या मोठ्या घटनांना पोलिसांकडून आळा सुद्धा बसत आहे .मात्र दिनांक 20 ला जी घटना घडली त्यांनी मोठ्या व्यपाऱ्यांची चिंता चांगलीच वाढविली आहे .चक्क 45 लाख रुपयांच्या बॅगेवरच अनोळखी व्यक्ति डल्ला मारीत रफुचक्कर होण्यात यशस्वी झाले असल्याची घटना निळापूर मार्गावरील अहफाज कॉटन जिनिंग जवळ शनिवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे. 

जिनिंग फॅक्टरीच्या दिवनजीला काही अनोळखी व्यक्तिनी मारहाण करीत त्याच्या जवळून अग्रवाल यांच्या मालकीची इंदिरा एक्जिम प्रा. लि जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे बँकेतून रोकड काढून चुकारा वाटण्याकरिता आणीत असताना 45लाख रुपये निळापूर ब्राह्मणी मार्गावर अहफाज कॉटन जिनिंग जवळ शनिवारी दुपारच्या दरम्यान ही लूट झाली.
याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील रात्री वणीत दाखल झाले.
अनिल अग्रवाल व देवेंद्र अग्रवाल हे या फॅक्टरीचे संचालक आहे. या जिनिंग फॅक्टरीमध्ये मनीष जगजीवन जंगले (47) रा. ढुमेनगर वणी हे गेल्या 10 वर्षांपासून दिवाणजी म्हणून काम करीत आहे.
आज शनिवारी दिनांक 20 मार्च रोजी ते नेहमीप्रमाणे आपली मोपेड ऍक्टिव्हा (MH 29 AV 5269) या गाडीने ते बँकेत गेले.
तिथे जाऊन त्यांनी 45 लाखांचा चेक वटवला व एका गुटख्याच्या पिशवीमध्ये ते पैसे घेऊन ते जिनिंगमध्ये परतत असताना हा सारा प्रकार घडल्याची माहिती आहे दरम्यान घटनेचा शोध वणीतील स्वतः पोलीस निरीक्षक वैभव जाधव करीत आहे.



