Vidarbh24News

Latest Online Breaking News

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यांनी सचिन वाझे यांना दिले होते दरमहा १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश…

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यांनी सचिन वाझे यांना दिले होते दरमहा १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश…

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा खळबळजनक खुलासा!

अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं असा खळबळजनक खुलासा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे एका आठ पानांच्या पत्राद्वारे केला आहे. परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे.

जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अत्यंत खळबळजनक खुलासा करत सचिन वाझे प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा खळबळजनक खुलाला परमबीर सिंह यांनी केल्याचा दावा टाईम्स नाऊ या इंग्रजी संकेतस्थळाने केला आहे. परमबीर सिंह यांच्या मुंबई पोलिस आयुक्त पदावरून गच्छंतीनंतर ब्लेम गेम सुरू होतानाच त्यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केला आहे. याआधीच अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्या कार्यपद्धतीकडे बोट उचलत त्यांची चूक असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले होते.

अनिल देशमुख यांना एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात परमबीर सिंह यांची बदली का केली असा सवाल करण्यात आला होता. त्यामुळे परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर पलटवार करत एकच खळबळ उडवून दिली आहे. टाईम्स नाऊ या संकेतस्थळाने एका ट्विटच्या माध्यमातून परमबीर सिंह यांचा खळबळजनक दावा प्रसिद्ध केला आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी गृहमंत्र्यांवर हे आरोप केले आहेत. सचिन वाझेंना बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे वसुल करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनीच दिले होते असाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.प्रत्येक महिन्यापोटी १०० कोटी रूपये गोळा करण्याचे आदेश खुद्द गृहमंत्र्यांनीच दिले होते या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) ने अटक केली आहे. सचिन वाझेंनी वापरलेल्या गाड्या, मुंबई पोलिस दलात पदाचा केलेला दुरूपयोग आणि पोलिस दलाची मलिन केलेली प्रतिमा यासारख्या गोष्टीमुळे परमबीर सिंह यांना जबाबदार ठरवत अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदी असलेल्या परमबीर सिंह यांची गच्छंती केली. त्यांच्या जागेवर मुंबई पोलिसांचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नेमणुक करण्यात आली आहे. पण परमबीर सिंह यांच्या दाव्यामुळे पोलिस दलासह राज्याच्या राजकारणातही मोठा भूकंप झाला आहे. याचा फटका हा महाविकास आघाडी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही बसेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!