कवठी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान(RGSA) कार्यशाळा संपन्न…
कवठी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान(RGSA) कार्यशाळा संपन्न..
“आमचं गाव आमचं विकास” या मुख्य विषयावर मार्गदर्शन..
(दिनांक – 3,- 4 मार्च) रोजी जिल्हा परिषद चंद्रपूर, पंचायत समिती सावली मधील ग्रामपंचायत कार्यालय कवठी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) सन 2020-21 अंतर्गत “आमचं गाव आमचं विकास” या मुख्य विषयावर आणि “ग्रामपंचायत विकास आराखडा संबंधित” गणस्तरीय ग्रामपंचायत सदस्य व ग्राम संसाधन गट यांची 1 दिवसीय गणस्तरीय GPDP कार्यशाळा ग्रामपंचायत कार्यालय कवठी अंतर्गत जिल्हा परिषद शाळा येथे घेण्यात आले .
या कार्यक्रमाचे उदघाट्न सावली पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य सौ. छायाताई दीपक शेन्डे यांचे शुभ हस्ते झाले. तर अध्यक्ष सरपंच सौ. कांताबाई पि. बोरकुटे उपस्थित होत्या. उदघाटणीय भाषणात सौ. शेन्डे यांनी ग्रामविकास, आरोग्य, 15 वा वित्त आयोग विषयी आणि पंचायत समिती तथा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या योजनां व निधी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच मुख्य मार्गदर्शक मनून पहिल्या दिवशी श्री. एल. चौधरी साहेब विस्तार अधिकारी आरोग्य. प.स.सावली यांनी 15 वा वित्त आयोग आराखडा, केंद्रीय आणि राज्य शासन निधी, योजना, उपाययोजना, ग्रामविकास, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा यावर तर दुसऱ्या दिवशी श्री.एल. चौधरी व सौ. आवले मॅडम पर्यवेक्षिका अंगणवाडी सावली यांनी बचत गट, आरोग्य, गरोदर माता, आरोग्य, अंगणवाडी निधी, पोषण आहार, योजना, शिक्षण, आशा वर्कर मार्गदर्शन इत्यादी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी कवठी उपसरपंच श्री. विलास बट्टे, सदस्य श्री. राकेश घोटेकर,श्री. सुनील कुळमेथे, सौ. संगीता पाल, सौ. बोरकुटे, सौ. डिम्पल धोटे, सौ. कोसरे, सौ. गोरडवार, श्री. सचिन सिडाम पो. पा. कवठी, श्री पवार सर मुख्याध्यापक कवठी, श्री. टिकाराम पि. म्हशाखेत्री तं. मु. स. अध्यक्ष कवठी, सौ. गेडाम मॅडम आशा वर्कर कवठी, सौ. राऊत मॅडम, सौ. कोसरे मॅडम अंगणवाडी सेविका कवठी तथा जिबगाव, उसेगाव, पारडी, चकपिरंजी, घोडेवाही येथील ग्रामपंचायत सदस्य, आणि जिल्हा परिषद शाळा शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन / सूत्रसंचालन श्री. सांगोळकर साहेब ग्रामविकास अधिकारी कवठी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. राकेश घोटेकर यांनी मानले.



