Vidarbh24News

Latest Online Breaking News

*बांबु कारागीरांना निस्तार दरातुन हिरवे बांबू उपलब्ध करून द्या*

*बांबु कारागीरांना निस्तार दरातुन हिरवे बांबू उपलब्ध करून द्या*

*वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा यांना बांबू कारागिरांनी दिले निवेदन*

पोंभुर्णा प्रतिनिधी :- तालुक्यात बांबु कामगार मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय हा सुप, टोपली, तट्टे बनविण्याचा असुन, त्या कामगारांना निस्तार दराने बांबु पोंभुर्णा डेपोमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी बांबू कामगारांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोंभुर्णा डेपोवर हिरवा बांबू उपलब्ध नसल्यामुळे अनेक कुटुंबावर संकट उभे ठाकले आहे. बांबू व्यवसायात पोंभुर्णा तालुक्यातील शेकडो कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. बांबू च्या वस्तू बनवून ते विकुण हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत.परंतू पोंभुर्णा डेपोमध्ये हिरवा बांबू नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे पोंभुर्णा डेपोमध्ये हिरवा बांबू उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी बुरड कामगारांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना चेतन बुरेवार, अशोक पद्मगीरीवार,शरद पद्मगीरीवार, अविनाश पद्मगीरीवार, सुनिता पद्मगीरीवार, विलास बुरेवार,कवडु बुरेवार,उषाबाई वासमवार, विजय तुराटे, सखाराम तुराटे, शांताबाई तुराटे,मिनाबाई कंदिकरेवार, लक्ष्मी तुराटे, सुलोचना जवादे व असंख्य बांबू कामगार व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!