Vidarbh24News

Latest Online Breaking News

खा.भावनाताई गवळी यांनी लोकसभेत पीक विम्याचा प्रश्न उचलून धरला

 

जिल्ह्यात 4 लाख 67 हजार एकवीस शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा काढले

 

-फक्त ऑफलाइन आणि ऑनलाईन 9, 776 शेतकऱ्यांनाच विमा लाभ दिला.

यवतमाळ :- पिक विमा कंपन्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात येत नसल्याचे अनेक वर्षांचा अनुभव आहे .दरवर्षी कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपन्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी लोकसभेत हा प्रश्न उचलून धरला.

विशेष म्हणजे पीक विमा ही योजना राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने चालवावे असे स्पष्ट मत व्यक्त केले . खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.कापूस सोयाबीन तर सोडाच पण साधा खर्च सुद्धा निघाला नाही.

परतीच्या पावसाने तर कहरच केला शेतकऱ्यांच्या हाता -तोंडाशी आलेले पीकही परतीच्या व ढंगफूटीच्या पावसाने नष्ट झाले. आर्थिक मदत मिळावी व पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी याकरता पिक विमा काढतो .यवतमाळ जिल्ह्यात 4 लाख 67 हजार एकवीस शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा काढले.

याकरिता केंद्र शासन व राज्य शासन तसेच शेतकऱ्यांनी iffco-tokio विमा कंपनीकडे 167 कोटीचा विमा हप्ता भरला. आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना देखील विमा कंपनीने फक्त आणि फक्त ऑफलाइन आणि ऑनलाईन 9, 776 शेतकऱ्यांनाच विमा लाभ दिला .वास्तविक एवढा मोठा जिल्हा तिथे फक्त 100 प्रतिनिधि सर्वे करण्यासाठी नेमले आहेत .

लाखो शेतकरी नुकसानीचा दावा दाखल करू शकले नाही. नेमका हाच मुद्दा खासदार भावनाताई गवळी यांनी लोकसभेत प्रकर्षाने मांडला. या कंपनीविरुद्ध कारवाई होऊन त्यांना  ( कंपनीला) ब्लॅकलिस्ट मधे टाकण्याची मागणी केली

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!