Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणीत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची व राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

– नगर पंचायत व नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत वणीत राजकीय चर्चा

वणी :- राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची शुक्रवारी या संवाद यात्रेचा वणी दौरा होता. या दौ-यासाठी ते वणीत आले होते. शुक्रवार 29 तारखेला दु .3 वाजता शेतकरी मंदिराच्या सभागृहात जयंत पाटील यांचे आगमन झाले. सभागृहात त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील रा.का .च्या पदाधिकारी व कार्यकर्त्याशी चर्चा केली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की, ” पक्षाशी जुळल्यानंतर पक्ष वाढविण्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात श्रीमंत नेते आहे. मात्र पैशाने कार्यकर्ते विकत घेता येत नाही. त्यामुळे ते अद्यापही निवडून आले नाही असा टोला त्यांनी लगावला.

” जर  शेकडो कार्यकर्ते जमा करण्याची क्षमता असेल तरच निवडून येणे शक्य आहे. निवडून येण्यासाठी  यंत्रणा उभी करायची असते त्यासाठी पैशाची गरज असते,

 

मात्र त्याने निवडून येऊ शकत नाही असेही जयंत पाटील म्हणाले.कार्यक्रमात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना परिसरातील समस्या तसेच पक्षवाढीसाठी येणा-या समस्येबाबत काही प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. यावर अनेकांनी पक्षवाढीबाबत मत मांडले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास पक्ष सक्षम आहे .त्यासाठी हा दौरा असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे आगामी नगर पंचायत व नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत चर्चा वणीत राजकीय वर्तुळात आहे.

कार्यक्रमाला महेंद्र लोढा प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, जयसिंग गोहोकार अध्यक्ष ,रुपाली चाकनकर, ख्वाजा बेग, मनाली बेलारे, सुनील गव्हाणे यांच्यासह वणी विधानसभा क्षेत्रातील तालुका, शहर, युवक, युवती व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!