Vidarbh24News

Latest Online Breaking News

*1 फेब्रुवारीपासून अपात्र शिधापत्रिकांची राज्य सरकारकडून होणार तपासणी!*

सर्वसामान्य जनतेला स्वस्त धान्य मिळावे यासाठी स्वस्त धान्याची दुकाने असतात. त्यासाठी शिधापत्रिकांचे वाटप सर्व लोकांमध्ये केले जाते.

मात्र, अनेकदा या शिधा वाटपामध्ये अनियमितता किंवा गळती दिसून येते. या विरोधात कठोर पावले उचलण्याचे आता महाराष्ट्र राज्य सरकारने ठरवले आहेत.

जे लोक शिधा पत्रिका बाळगण्यासाठी अपात्र असतील त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.

दोन महिने चालणाऱ्या या प्रक्रियेत केंद्र सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे पालन केले जाणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून अपात्र शिधापत्रिका धारकांची शोध मोहीम राज्य हाती घेईल. त्यासाठी तलाठी आणि शासकीय कर्मचारी यांची मदत घेतली जाणार आहे.

राज्यभरात बीपीएल, अन्तोदय, केसरी अशा विविध प्रकारच्या कार्डच्या स्वरूपामधुन जवळपास 25 कोटी लोकांना या शिधापत्रिका दिल्या गेल्या आहेत.

या प्रत्येकाची तपासणी करून ज्या लोकांना योग्य तो पुरावा देता येईल ते लोक गट अ मध्ये, आणि ज्या लोकांना पुरावा देता येणार नाही ती लोकं गट-ब मध्ये घालून ही वर्गवारी करण्यात येणार आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!