वांजरी येथे 21 वर्षीय युवकाने चॉकलेटची आशा दाखवून, अल्पवयींन मुलीचा केला विनयभंग
वणी :- वांजरी येथे अल्पवयींन मुलीसोबत निर्लज्ज वागणूक करणारा आरोपी मीराज मो. युसूफ यास अटक व त्याचाविरूद्ध विविध कलमाद्वारे गुन्हा नोंदविला आहे. याविषयी सविस्तर असे कि, मोलमजूरी मिळविण्यासाठी परप्रांतीय नागरीक कामाचा शोधात भटकंतीवर असतात. पण त्यांचा परिवार सुरक्षीत नसतो या घटनेवरुन समोर आले आहे. बस्ती (ऊतर प्रदेश) येथील काही परिवार मोलमजुरी साठी वांजरी चुनाभट्टी येथे आले त्यांना एक १५ वर्षाची मुलगी शाळेला “कोरोना “मुळे सूटी असल्याने सुरक्षेच्या दुष्टीने मुलीस सोबत वांजरीला आणले.
आणि ती मुलगी सुद्धा आई सोबत मोलमजुरी करीत होती तिथेच सालठूवा(ऊतर प्रदेश) येथील २१ वर्षीय युवक मीराज मो युसूफ हा कामावर होता.याची कुदृष्टि अल्पवयीन मुलीवर पडली व त्याने तिला चॉकलेट देण्यासाठी सोमवार दि 28 ला रात्री २ वाजता फोन करून बोलाविले व त्या मुलीचा विनयभंग केला .
घरच्या मंडळींना मुलगी पाहाटे 4 च्या दरम्यान गायब झाल्याची चाहुल लागली असता, तीचा शोध घेतला असता ,एका ठिकाणी मुला सोबत आढळून आली .
घरचे मंडळी पाहुन ती घाबरली तीने घरच्या मंडळींना हकिकत सांगीतली त्यामुळे आरोपी मिराज मो .यूसूफ (२१) विरूद्ध आईच्या तक्रारी वरून अटक करून ३५४,(अ) , (१) भादवि सहकलम १२ पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
.
पुढील तपास उपविभागपोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्गदर्शनाखाली सापोनी गोपाल जाधव, सापोनी मायाताई चाटसे करीत आहेत.



